उत्पादन कमी तरीही विक्रीला फटका...जाणून घ्या कारण

production and selling of coconut affected
production and selling of coconut affected

नागपूर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर देशातील मंदिरे, धार्मिक स्थळे बंद, लग्न समारंभही रद्द करण्यात आलेले आहेत. यामुळे विदर्भात नारळाच्या मागणीत 70 टक्के घट झालेली आहे. गणरायाच्या पूजेसाठी, नवस फेडण्यासाठी भाविकांकडून नारळाची खरेदीला मोठी मागणी असते. कोरोनामुळे नारळाचा संपूर्ण व्यवसाय ठप्प झालेला आहे. 

तमिळनाडू, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्ये नारळाच्या उत्पादनाला फटका बसला असताना सुरू असलेल्या पावसामुळे आवकही कमी झालेले आहे. सध्या तीन ते चार ट्रकमध्ये नारळ येत असून एका गाडीत साठ हजार प्रमाणे पावणेदोन लाख नारळाची आवक होत आहे.

सणासुदीच्या दिवसांत उपराजधानीत पावणेतीन लाख नारळाची विक्री होत होती. मागणी नसल्याने ती आता सव्वा लाखावर आलेली आहे. आषाढी पौर्णिमेपासून हिंदू सणांची सुरुवात होते. श्रावण महिन्यानंतर मंदिरातील पूजेसाठी नारळाची मागणी दररोज वाढत असते. यंदा मंदिर अद्यापही बंदच आहेत. त्यामुळे मंदिरासमोर बसून नारळ विक्री करणाऱ्यांचा रोजगार गेला. नारळाला गणेशोत्सवात मोठी मागणी असते.

गणेशोत्सवात चालू आठवड्यात नारळांची सहा ते सात ट्रक म्हणजे पावणेतीन लाख नारळ इतकी आवक झाली. दररोज अडीच लाख नारळांची विक्री होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा नारळाची आवक कमी आहे,' अशी माहिती नारळाचे किराणा मर्चंट असोसिएशनचे माजी अध्यक्ष घनश्‍याम छाबरिया यांनी दिली. घाऊक बाजारात पंधरा ते बारा रुपये प्रतिनारळाचे दर असून किरकोळ बाजारात 20 रुपये प्रतिनग नारळाची विक्री केली जात आहे. 

उपराजधानीत पूर्वी सात ते आठ ट्रक नारळाची आवक होत होती. उत्पादन घटल्याने आणि पाऊस कमी असल्याने यंदा फक्त तीन ते चारच ट्रक नारळाची आवक होत आहे. असे असले तरी दर स्थिरावलेले आहेत. अनेक सणांवर कोरोनाचे सावट असल्याने यंदा नारळाची मागणीही कमी आहे. 
-प्रभाकर देशमुख, अध्यक्ष, नागपूर चिल्लर किराणा व्यापारी संघ. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com