राम मंदिर हा अस्मिता व श्रद्धेचा विषय आहे, त्याचे राजकारण शिवसेना करणार नाही.

Ram temple is a matter of faith.
Ram temple is a matter of faith.

नागपूर : राम मंदिर हा आमच्यासाठी अस्मिता व श्रद्धेचा विषय आहे. त्याचे राजकारण शिवसेना करणार नाही. ज्यांना करायचे त्यांनी खुशाल करावे, असे प्रत्युत्तर राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी विश्व हिंदू परिषद व त्यांच्याशी सलग्न संस्थांना दिले. 

पालकमंत्री या नात्याने ते दोन दिवसांसाठी गडचिरोलीच्या दौऱ्यावर आले असता नागपूर विमानतळावर प्रसिद्धी माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री नसताना अयोध्येला जाऊन आले व मुख्यमंत्री झाल्यावरही अयोध्येला गेले होते. त्यामुळे कोण काय म्हणते याला अर्थ नाही. आमच्यासाठी हा राजकारणाचा मुद्दा आधीपासूनच नव्हता आणि आजही नाही.

राममंदिराच्या भूमिपूजनाला मुख्यमंत्री जाणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. देशावर कोरोनाचे संकट असल्याने ऑनलाईन भूमिजपून करावे असाही सल्ला दिला जात आहे. सध्या भूमिपूजनाऐवजी कोण जाणार, कोण नाही याचीच चर्चा अधिक केली जाते. यावर शिंदे यांनी शिवसेनेची भूमिका मांडली. 

सध्या राज्यावर कोरोनाचे संकट आहे या संकटातून नागरिकांना बाहेर काढण्यास आम्ही प्रथम प्राधान्य दिले आहे, ही राजकारण करण्याची वेळ नाही, विरोधी पक्षाला शिंदे यांनी आपल्या शैलीत उत्तर दिले, गडचिरोली मध्ये सीआरपीएफ व पोलीस जवान मोठया प्रमाणात कोरोना बाधित झाले आहे याकडे त्यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की आम्ही त्यांची काळजी घेत आहोत. आज बाधित पोलिस जवानांची भेट घेणार आहे,

गडचिरोलीत ४ ऑगस्ट पासून शाळा सुरू होणार का असे विचारले असता ते म्हणाले की मी आज आढावा घेईल त्यानंतर परिIस्थिती पाहून निर्णय घेऊ असे ते म्हणाले. 
गडचिरोलीत रस्ते नसल्यामुळे गरोदर महिलेला २५ किलोमिटर पायपीट करून रूग्णालयात जावे लागत आहे.

याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले की आपणा रस्त्याच्या विकासाची कामे सुरु करणार आहोत,नक्षलग्रस्त भागाच्या विकासाला प्राधान्य देणार आहे, भाजपने दूध दरवाढी साठी आंदोलन केले आहे याकडे त्यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले या संदर्भात कॅबिनेट मध्ये चर्चा झाली आहे, मुख्यमंत्री शेतकरी संघटनेच्या संपर्कात आहे, लवकरच तोडगा निघेल असे शिंदे म्हणाले . 

(संपादन : प्रशांत राॅय)


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com