esakal | शेतकरी आंदोलनापर्यंत पाकिस्तान, चीनचा हात पोहोचूच शकत नाही - रामदास आठवले
sakal

बोलून बातमी शोधा

ramdas athawale commented on farmers agitation in nagpur

शेतकऱ्यांचे आदोलन पंजाब, हरियाणाच्या शेतकऱ्यांनापर्यंत मर्यादित असून यात पाकिस्तान, चीनचा हात पोहोचूच शकत नाही, असे एनडीएचा प्रमुख घटक पक्ष रिपाईचे (आठवले) अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी स्पष्ट केले. 

शेतकरी आंदोलनापर्यंत पाकिस्तान, चीनचा हात पोहोचूच शकत नाही - रामदास आठवले

sakal_logo
By
नीलेश डोये

नागपूर : मोदी सरकारकडून करण्यात आलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी आंदोलन करीत आहेत. या आंदोलनावर भाजप नेत्यांकडून टीका होत असून पाकिस्तान, चीनचा हात असल्याचा आरोप होत आहे. शेतकऱ्यांचे आदोलन पंजाब, हरियाणाच्या शेतकऱ्यांनापर्यंत मर्यादित असून यात पाकिस्तान, चीनचा हात पोहोचूच शकत नाही, असे एनडीएचा प्रमुख घटक पक्ष रिपाईचे (आठवले) अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी स्पष्ट केले. 

हेही वाचा -  पोलिसांनो, तैनातीबाबत होणार 'क्रॉसचेकींग'; उपस्थित नसल्यास होणार कारवाई

आठवलेंनी सामाजिक कल्याण विभागाचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकार परिषदते ते म्हणाले की, मोदींनी केलेले कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत. यात सुधारणा करण्याची तयारी सरकारची आहे. परंतु, कायदेच मागे घ्या, अशी भूमिका बरोबर नाही. सरकार कायदा मागे घेणार नाही. शेतकाऱ्यांनीही सरकारशी संवाद साधण्यास पुढे यायला हवे. थंडीमध्ये शेतकरी आहेत हे आम्हालाही चांगले वाटत नाही. सरकारची संवादाची भूमिका आहे. आंदोलन चिघळवणे बरोबर नाही. संवादातून मार्ग निघेल. आंदोलनात पाकिस्तान किंवा चीनचा काही संबंध नाही. परंतु, पियूष गोयल यांनी आंदोलनात माओवादी शिरल्याचे म्हटले आहे. याची चौकशी करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.  पत्रपरिषदेत प्रदेश अध्यक्ष भूपेश थूलकर, राजन वाघमारे, महेंद्र मानकर, बाळू घरडे आदी उपस्थित होते.  

हेही वाचा - ‘राष्ट्रवादी काँग्रेस फक्त पश्चिम महाराष्ट्राचा विचार...

आंबेडकरांनी एनडीएत यावे -
रिपाई एक्य आता शक्य नाही. प्रकाश आंबेडकर यांनी वंचित वंचित बहुजन आघाडी काढली. एकट्या बळावर  सत्ता मिळवता येत नाही.  प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात काम करायला तयार आहे.  प्रकाश आंबेडकर यांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एनडीएमध्ये सहभागी व्हावे, असे आठवले म्हणाले.  काँग्रेसमध्ये शरद पवार यांचे नुकसान झाले. त्यांनीही एनडीएत येण्याचे आवाहन केले. 

हेही वाचा - फडणवीस सरकारचा आणखी एक निर्णय स्थगित : शासकीय जमिनीचा मालकी हक्क देण्यावर स्थगिती

मुंबईत उपमहापौर रिपाईचा -
मुंबई महानगर पालिका निवडणूक भाजपसोबत मिळून लढणार आहो. यावेळ भाजप आणि आमची सत्ता येणार असून महापौर भाजप, तर उपमहापौर आमचा होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा - कोरोनाच्या सावटातही सुरळीतपणे पार पडली राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा; तब्बल ५०७५ विद्यार्थ्यांची...

शिष्यवृत्ती बंद होणार - 
राज्याकडून अर्जांची माहिती न आल्याने रक्कम देण्यास विलंब होत आहे. परंतु, शिष्यवृत्ती बंद होणार नाही. दोन वर्षांपूर्वी  शिष्यवृत्तीचा निधी वेगळ्या कामावर खर्च झाला होता. तसे होता कामा नये, असेही ते म्हणाले.