सर, आमच्या जीवाची पर्वा नाही का? विद्यार्थी विचारत आहेत सवाल.. पण का? वाचा

नीलेश डोये
Saturday, 22 August 2020

विद्यार्थ्यांना मोडकळीस असलेल्या इमारतीतच शिक्षण घ्यावे लागत आहे. एक प्रकारे त्यांच्या जिवाशीच विभाग खेळत आहे. अशा इमारतीत शिक्षण घेण्यासाठी पालक विद्यार्थ्यांनी कसे पाठविणार, असाच सवाल उपस्थित होत आहे.

नागपूर : जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थी संख्या घटत चालली आहे. यासाठी अनेक कारणे सांगण्यात येत असले तरी प्रशासन आणि अधिकाऱ्यांची मानसिकता हे प्रमुख असल्याचे सांगण्यात येते. सर्व शिक्षा अभियानातून वर्ग खोल्या दुरूस्तीसाठी निधी मिळाला. परंतु दोन वर्षात वर्ग खोल्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले नसल्याची माहिती आहे.

अधिकाऱ्यांच्या अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे काम रखडल्याची चर्चा आहे. विद्यार्थ्यांना मोडकळीस असलेल्या इमारतीतच शिक्षण घ्यावे लागत आहे. एक प्रकारे त्यांच्या जिवाशीच विभाग खेळत आहे. अशा इमारतीत शिक्षण घेण्यासाठी पालक विद्यार्थ्यांनी कसे पाठविणार, असाच सवाल उपस्थित होत आहे.

वाचा - काय आहे कवडी आणि तिची किंमत? घ्या जाणून

मिळालेल्या माहितीनुसार सर्व शिक्षा अभियानातून वर्ग खोली दुरुस्त करण्यासाठी निधी शिक्षण विभागाला प्राप्त झाला. यातून १२ शाळांच्या वर्ग खोल्यांची दुरुस्ती करायची होती. प्रत्येक शाळेच्या दुरुस्तीवर अडीच ते तीन लाखांचा खर्च प्रस्तावित करण्यात आला. या शाळांमधील वर्ग खोल्या पावसाळ्यात गळत असल्याचे सांगण्यात येते.

संपूर्ण वर्ग खोल्यांना ओल येत असे. त्यामुळे विद्यार्थ्यांची चांगलीच अडचण होत होती. या वर्ग खोल्या लवकरात लवकर दुरुस्त करण्याच्या सूचना होत्या. परंतु दोन वर्षात यांच कामच पूर्ण झाले नाही. या कामाची जबाबदारी समग्र शिक्षा अभियानाचे कार्यकारी अभियंता राकेश वाघमारे यांच्याकडे आहे. परंतु त्यांनी याकडे लक्ष दिले नसल्याची चर्चा आहे. कामाच्या गुणवत्तेबाबतही गुप्तता पाळण्यात येत असल्याचे सूत्रांकडून समजते. शाळा बांधकामसाठी डीपीसीमधून सुद्ध २१ कोटींचा निधी पहिल्या टप्प्यात मंजूर झाला होता. आता याला कात्री लागणार आहे. याचे प्रस्तावही अद्याप तयार नसल्याची माहिती आहे.

सभापतींकडून पाहणी

शिक्षण सभापती भारती पाटील यांनी काही दिवसांपूर्वी या शाळांची पाहणी केली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी कामाची गती आणि गुणवत्तेबाबत कोणतीही विचारणा केली नाही. यापुढे कोणतेही काम त्यांना विचारूनच करण्याच्या सूचना शिक्षण विभागाला दिल्या. यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. विभाग प्रमुखांच्या इशाऱ्यावरूनच त्यांनी या सूचना केल्याची चर्चा आहे.

हेही वाचा - नऊ हजारांचे जलशुद्धीकरण विभागाने खरेदी केले चाळीस हजारांत, धोळ करण्याची स्पर्धा...

सीईओंना लक्ष देण्याची गरज

शिक्षण व्यवस्थेची स्थिती चांगली नाही. शिक्षणाचे महत्त लक्षात घेता तत्कालीन सीईओ कादंबरी बलकवडे यांनी व्यवस्था सुधारण्याचा प्रयत्न केला होता. यश येण्यापूर्वीच त्यांची बदली. शिक्षकांवर त्यांचा वचक होता. ही व्यवस्था चांगली करण्यासाठी सीईओ योगेश कुंभेजकर यांना कोरोनासह याकडेही लक्ष देण्याची गरज आहे.
 

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: School Classroom repair work not done in two years