नागपूरकरांनो, तुमच्या झोनचा या यादीत तर समावेश नाही ना? वाचा सविस्तर...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 जून 2020

नागपूर शहरात हजाराच्या जवळपास कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच 16 जणांचा मृत्यू झाल्याचे कोरोना डायरित नोंद करण्यात आली आहे. आता रुग्ण आढळलेला परिसरच सील करण्यात येत आहे. अधिक रुग्ण वाढू नये म्हणून ही उपाययोजना असली तरी याचा काहीही उपयोग होत नसल्याचे दिसत आहे.

नागपूर : कोरोनाचा प्रकोप वाढतच आहे. काही केल्या वाढत्या रुग्णांवर नियंत्रण मिळविण्यात प्रशासनाला यश आलेले नाही. शहरातील बाधित रुग्णांची संख्या हजाराच्या जवळपास पोहोचली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दिवसेंदिवस नवीन परिसरात कोरोनाचा शिरकाव होत असल्याचे चिंतेत भरच पडत आहे. यामुळे विविध झोनमधील काही परिसर सील करण्यात आले आहेत. 

कोरोना आल्यानंतर नागरिकांच्या मनात भीती निर्माण व्हायला सुरुवात झाली होती. शहरात पहिला रुग्ण आढळल्यानंतर ही भीती अधिक वाढली. यानंतर प्रशासनही कामाला लागले. कोरोनाचा पसार होऊ नये म्हणून अनेक उपाययोजना करण्यास सुरुवात केली. यानंतर देशात लॉकडउन घोषित झाले. आता तरी कोरोनावर नियंत्रण मिळविता येईल असे वाटत होते. मात्र, तसे झाले नाही.

हेही वाचा - खाकी वर्दीतील लव्हबर्डची चर्चा जोरात, वरिष्ठांपर्यंत पोहोचले प्रकरण अन्...

नागपूर शहरात हजाराच्या जवळपास कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच 16 जणांचा मृत्यू झाल्याचे कोरोना डायरित नोंद करण्यात आली आहे. आता रुग्ण आढळलेला परिसरच सील करण्यात येत आहे. अधिक रुग्ण वाढू नये म्हणून ही उपाययोजना असली तरी याचा काहीही उपयोग होत नसल्याचे दिसत आहे. यावर वेळीच नियंत्रण न मिळविल्या समस्या अधिच गळद होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

आशीनगर झोन

आशीनगर झोनअंतर्गत प्रभाग सहामधील बाबा बुधाजीनगर परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आला आहे. टेका येथील बाबा बुधाजीनगरच्या उत्तर पूर्वेस गुरुनानक जनरल स्टोर्स, उत्तर पश्‍चिमेस दर्शन सिंग यांचे घर, दक्षिण पश्‍चिमेस सुरेंद्र किराणा स्टोर्स, दक्षिण पूर्वेस मदिना मेडिकल स्टोर्सपर्यंतचा परिसर सील करण्यात आला आहे.

अधिक माहितीसाठी - नागपूरच्या या 'लेडी डॉन'ने केली अनेक पोलिस अधिकाऱ्यांची "शिकार"

गांधीबाग महाल झोन

गांधीबाग महाल झोनअंतर्गत प्रभाग आठमधील टिमकी भानखेड्यातील झांगरे मोहल्ला परिसरातही कोरोनाबाधित आढळल्याने परिसरातही निर्बंध लावण्यात आले. झांगरे मोहल्ल्याच्या उत्तर पश्‍चिमेस दुर्गा माता मंदिर, उत्तर पूर्वेस गणेश गौर यांचे घर, दक्षिण पूर्वेस ईश्‍वर वट्टीधरे तर दक्षिण पश्‍चिमेस वामन भगतकर यांच्या घरापर्यंतचा परिसर प्रतिबंधित करण्यात आला आहे. 

धंतोली झोन

धंतोली झोनअंतर्गत प्रभाग 35 मधील सेंट्रल रेल्वे आरपीएफ ऑफिस आरबीआय क्वार्टर क्रमांक 367 परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळला. त्यामुळे हा परिसरही सील करण्यात आला.

क्लिक करा - सुशांतला होता हा त्रास... नियमित घ्यायचा टॅबलेट्‌स

हनुमाननगर झोन

हनुमाननगर झोनअंतर्गत प्रभाग 32 मधील मानेवाडा रोडवरील सावित्रीबाई फुलेनगरातील परिसरातही निर्बंध लावण्यात आले. येथील उत्तर पूर्वेस अजय बोट यांचे घर, उत्तर पश्‍चिमेस असलम शेख यांचे घर, दक्षिण पश्‍चिमेस विकास घरडे यांचे घर, दक्षिण पूर्वेस सविता बागडे यांचे घरापर्यंतचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले. प्रतिबंधित क्षेत्रात वैद्यकीय सेवा देणारे तसेच शासकीय अधिकाऱ्यांना बाहेर पडणे तसेच आत प्रवेश करता येईल. मात्र, इतर नागरिकांना येथे प्रवेशबंदी आहे. 

बजाजनगर, जवाहरनगरातील नागरिकांना दिलासा

कोरोनाबाधित रुग्णाचा दुसरा अहवाल निगेटिव्ह आल्याने तसेच या भागात नवीन रुग्ण न आढल्याने बजाजनगर परिसरातील काही भागातील नागरिकांना आयुक्तांनी दिलासा दिला. बजाजनगरातील उत्तर पश्‍चिमेस उत्कर्ष विशाखा अपार्टमेंट, उत्तरेस ऍड. शिंदे यांचे घर, दक्षिण पूर्वेस ऍड. इंगोले यांचे घर, दक्षिण पश्‍चिमेस भुसारी यांचे घरापर्यंतच्या परिसरातून निर्बंध हटविण्यात आले. याशिवाय धरमपेठ झोनअंतर्गत प्रभाग 14 मधील सदर काटोल रोड परिसरातील काही भाग मोकळा करण्यात आला. हनुमाननगर झोनअंतर्गत जवाहरनगर व ताजनगर परिसरातील निर्बंध हटविण्यात आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Seals in some zones in Nagpur