कोरोना ब्रेकिंग : नागपुरात शंभर दिवस पूर्ण; तब्बल इतक्‍या जणांना लागण अन्‌ मृत्यू...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 जून 2020

नागपूरच्या हिंगणा भागात साठपेक्षा अधिक रुग्ण आढळून आल्यानंतर दक्षिण नागपुरातील चंद्रमणीनगर कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे. तर शनिवारी रामदासपेठेत कोरोनाबाधित व्यक्ती आढळला. या व्यक्तीला बाहेरच्या प्रवासाची पार्श्‍वभूमी आहे. घरीच विलगिकरणात असताना खासगी प्रयोगशाळेत त्याच्या घशातील द्रव्याची चाचणी केली असता, त्याला कोरोना विषाणूची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. 

नागपूर : उपराजधानीत कोरोनाचा शिरकाव होऊन शंभर दिवस पूर्ण झाले आहेत. तीन महिन्यांत एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 1,266 वर पोहोचला आहे. तसेच 17 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. शहर सामुदायिक प्रार्दुभावाच्या उंबरठ्यावर आल्याची भीती जनमानसात व्यक्त होताना दिसत आहे. शनिवारी आणखी 61 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल पुढे आला आहे. 

मेडिकलमधील दोन परिचारिका, एक स्वच्छतादूत काही दिवसांपूर्वी कोरोनाबाधित आढळले होते. आणखी ओटीजीमध्ये कार्यरत एका "ब्रदर'ला कोरोनाची बाधा झाल्याची माहिती प्रयोगशाळेतून पुढे आली. कोरोना वारियर्स बाधित होत आहेत. घरापासून दूर ठेवण्यात आले. त्यांच्या संपर्कातील व्यक्तींना विलगीकरणात घेण्यात येणार आहे. आतापर्यंत केवळ मोमीनपुरा, सतरंजीपुरा, नाईक तलाव-बांगला देश या वस्तीमध्ये कोरोनाचा ब्लास्ट झाला. आता हळुहळु एक एक वस्ती कोरोनाच्या हॉटस्पॉटवर येत आहे.

हेही वाचा - काकूच्या प्रेमात आकंठ बुडाला पुतण्या, काका ठरत होता अडसर... मग

नागपूरच्या हिंगणा भागात साठपेक्षा अधिक रुग्ण आढळून आल्यानंतर दक्षिण नागपुरातील चंद्रमणीनगर कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे. तर शनिवारी रामदासपेठेत कोरोनाबाधित व्यक्ती आढळला. या व्यक्तीला बाहेरच्या प्रवासाची पार्श्‍वभूमी आहे. घरीच विलगिकरणात असताना खासगी प्रयोगशाळेत त्याच्या घशातील द्रव्याची चाचणी केली असता, त्याला कोरोना विषाणूची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. 

शहरात नवीन बाधित आढळलेल्या व्यक्तींमध्ये नाईक तलाव- बांगलादेश परिसरातील सर्वाधिक अधिक रुग्ण आहेत. याशिवाय चंद्रमणीनगर, नारायण पेठ (प्रेम नगर)चे , लष्करीबाग, सावनेर, हंसापुरी, गरीब नवाजनगर, गणेशपेठ, हिंगणा, मेहंदीबाग, उप्पलवाडी, कळमेश्वरयेथील रुग्णांचा समावेश आहे. येथील कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांची माहिती मिळवण्याचा प्रयत्न आरोग्य विभागाकडून सुरू आहे. दिवसभरात सर्वाधिक बाधित आलेले व्यक्ती हे पाचपावली विलगिकरण केंद्रातील आहेत. या रुग्णांना तातडीने उपचारासाठी मेडिकल, मेयोसह एम्समध्ये हलवण्यात आले.

अधिक माहितीसाठी - शिक्षकांनो व्हा सावधान ! दहा शिक्षकांवर झाली "ही' कारवाई, काय गुन्हा होता "त्यांचा', वाचा...
प्रेमनगरात धोक्‍याची घंटा

प्रारंभी खासगी प्रयोगशाळेत कोरोना चाचणीला परवानगी दिली नव्हती. परंतु अलिकडेच खासगी प्रयोगशाळेत घशातील द्रवाचे नमुने तपासण्याला परवनाग देण्यात आली. आतापर्यंत पन्नासपेक्षा अधिक चाचण्या खासगीतून पुढे आल्या आहेत. नुकतेच रामदासपेठेतील रुग्णाचे नमूने खासगीतून बाधित आले आहेत. याशिवाय प्रेमनगर, लष्करीबागला कोरोनाचा मोठा धोका आहे. शहरातील चंद्रमणीनगरसह नारायण पेठ (प्रेमनगर) येथे दिवसभरात 13 तर लष्करीबाग परिसरात नवीन 4 बाधित आढळले. यामुळे आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले आहेत. 

32 जणांची कोरोनावर मात

शहरात एकिकडे मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित आढळून येत आहेत.त्याच गतीने उपचारातून बरे होणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या बऱ्यापैकी आहे. शनिवारी एम्समधून 5, मेयोतून 12 तर मेडिकलमधून 15 अशा एकूण 32 जणांनी कोरोनावर मात केली आहे. उपराजधानीत 11 मार्च रोजी पहिला रुग्ण आढळला होता. यानंतर 30 एप्रिल रोजी शहरात केवळ 139 रुग्ण होते. मात्र अवघ्या 100 दिवसात 1266 कोरोनाबाधित आढळले. ही चिंता करणारी बाब असली तरी आतापर्यंत 844 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

क्लिक करा - शासन निर्देशानुसारच शाळा सुरु होणार, असे आहेत शासनाचे निर्देश

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

दक्षिण नागपूर कोरोनामुक्त होते. परंतु, अवघ्या चार दिवसांत मात्र कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने शहरातील कोरोना हॉटस्पॉटच्या यादीत आले आहे. चंद्रमणीनगरात अवघ्या चार ते पाच दिवसांत 30 रुग्णांची नोंद झाली. रामदासपेठ आणि मेहंदीबागमध्ये कोरोनाबाधित आढळले असल्याने येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

शहरात एाप्रिल महिन्यात झालेले मृत्यू

 • 5 एप्रिल रोजी सतरंजीपुरा येथील 68 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू 
 • 29 एप्रिल रोजी मोमिनपुरा येथील 70 वर्षीय वृद्धाचा मृत्यू 

शहरात मे महिन्यात झालेले मृत्यू

 • 5 मे रोजी पार्वतीनगर येथील 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू 
 • 11 मे रोजी पांढराबोडी येथील 29 वर्षीय युवकाचा मृत्यू 
 • 16 मे रोजी गड्डीगोदाम येथील 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू 
 • 17 मे रोजी शांतीनगर येथील 54 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू 
 • 18 मे रोजी मोमिनपुरा येथील 70 वर्षीय महिलेचा मृत्यू 
 • 25 मे रोजी मोमिनपुरा येथील 54 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू 
 • 27 मे रोजी सतरंजीपुरा येथील 71 वर्षीय महिलेचा मृत्यू 
 • 39 मे रोजी रस्त्यावरचा भिक्षेकऱ्याचा मृत्यू 
 • 31 मे रोजी हिंगणा रोडवरील 73 वर्षीय वृद्धाचा मृत्यू

महत्त्वाची बातमी - शिक्षकांसाठी शाळा २६ पासूनच, या शाळेतील शिक्षकांना आदेश
 

शहरात जून महिन्यात झालेले मृत्यू

 • 4 जून रोजी अमरावती येथील 65 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू 
 • 4 जून रोजी मध्य प्रदेशातील 62 वर्षीय महिलेचा मृत्यू 
 • 7 जून रोजी अमरावती येथील 58 वर्षीय महिलेचा मृत्यू 
 • 8 जून रोजी हंसापुरी येथील 42 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू 
 • 12 जून रोजी अकोला येथील 56 वर्षीय व्यक्‍तीचा मृत्यू 
 • 15 जून रोजी मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथील 50 वर्षीय व्यक्‍तीचा मृत्यू

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sixty one corona patient found in Nagpur