अखेर क्रूर मुलाची मनोरुग्णालयात रवानगी; बापाची चाकूने वार करून केली होती हत्या 

अनिल कांबळे 
Thursday, 26 November 2020

बुधवारी रात्री सिकंदर याने सम्राट यांच्यासोबत वाद घातला. संतप्त सिकंदर याने चाकूने वार करून सम्राट यांची हत्या केली. सम्राट यांचा मृतदेह फरफटत घराबाहेर आणला. तो रस्त्यावर फेकला.

नागपूर ः  मानसिक असलेल्या सिंकदर याने कुऱ्हाडीने वार करून वडील सम्राट रंगारी (वय ५५) यांची हत्या केली. सिंकदर हा मनोरुग्ण असल्याने पोलिसांनी त्याची मानकापूरमधील प्रादेशिक मनोरुग्णालयात रवानगी केली. ही घटना एमआयडीसीतील वानाडोंगरीजवळील पालकर ले-आऊट येथे बुधवारी रा़त्री घडली. सिकंदर रंगारी (वय २७),असे मारेकरी मुलाचे नाव आहे. सम्राट हे एमआयडीसीतील कंपनीत काम करीत होते. दोघेही घरी एकटेच होते.

बुधवारी रात्री सिकंदर याने सम्राट यांच्यासोबत वाद घातला. संतप्त सिकंदर याने चाकूने वार करून सम्राट यांची हत्या केली. सम्राट यांचा मृतदेह फरफटत घराबाहेर आणला. तो रस्त्यावर फेकला. त्यानंतर सिकंदर घरात गेला. दरवाजा बंद केला. कपडे काढून तो जेवायला लागला. रस्त्यावर मृतदेह बघून परिसरात नागरिकांमध्ये खळबळ उडाली.

जाणून घ्या - वाघाचा मागोवा घेण्यासाठी वनविभागाचे पथक जंगलात घालत होते गस्त; समोरचे दृष्य पाहताच बसला धक्का

एका नागरिकाने एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह मेडिकल कॉलेज हॉस्पिटलकडे रवाना केला. 

दरवाजा तोडून पोलिस घरात गेले असता सिकंदर हा नग्न अवस्थेत जेवण करताना पोलिसांना दिसला. पोलिसांनाही आश्चर्याचा धक्का बसला. सिकंदर हा मनोरुग्ण असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.  

सविस्तर वाचा - ऐटीत खरेदी करायला गेला पोलिसांची वर्दी; दुकानदाराला आला संशय आणि घडली जेलवारी

महिलेची आत्महत्या

संध्या राजेश मेश्राम (वय ३४, रा. धम्मदीपनगर) या महिलेने विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी रात्री उघडकीस आली. असे मृत महिलेचे नाव आहे. संध्या यांनी गुरुवारी रात्री आठच्या सुमारास आपल्या घरात विष प्राशन केले. ती बेशुद्ध पडल्यानंतर कुटुंबीयांनी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान संध्या यांचा मृत्यू झाला. यशोधरानगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. 

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Son who attacked on his father sent to mental hospital