आडव्या आरायंत्रावर येणार संक्रांत, तातडीने माहिती देण्याची वन विभागाला सूचना

state government order to investigate sawmill
state government order to investigate sawmill

नागपूर : आडव्या आरायंत्रांना परवानगी देताना कोणत्या निकषाचे पालन केले आहे, त्याची तपासणी करण्याच्या सूचना राज्य सरकारने वन विभागाला दिल्याची माहिती पुढे आली आहे. यामुळे आता आडवे आरायंत्र असलेले व्यापारी अडचणीत येण्याची शक्यता बळावली आहे. 

तत्कालीन प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) उमेशकुमार अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली २३ जुलै २०१८ ला झालेल्या राज्यस्तरीय समितीच्या अकराव्या बैठकीत ४२ इंचाच्या ५० आडव्या आरायंत्राला परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर झालेल्या १२ व्या बैठकीत अशा आरायंत्रांना परवानगी देऊ नये याबाबतचा ठराव केला होता. मात्र, राज्यस्तरीय समितीने १५ नोव्हेंबर २०१९ च्या पंधराव्या बैठकीत अकराव्या बैठकीत झालेला निर्णय काम ठेवून या आरायंत्राना परवानगी देण्याचा निर्णय कायम ठेवला. उच्च न्यायालयामध्ये याबाबत फेरयाचिका दाखल करण्यात आली होती. यावेळी न्यायालयाने संबंधित आरायंत्राना दिलेल्या परवानग्या चुकीच्या आहेत. परवाने रद्द करण्याबाबत योग्य ती पावले उचलावीत अशा प्रकारचे निर्देश दिले. यापूर्वी झालेल्या एका प्रकरणात उच्च न्यायालयाच्या आदेशाला अवमान केल्याबाबत तत्कालीन मुख्य वन सचिव अशोक खोत आणि वन मंत्री स्वरुपसिंग नाईक यांना शिक्षा झाली होती. 

संबंधित आरायंत्राना परवानगी द्यावी की न द्यावी याचा अभ्यास करण्यासाठी जी समिती समिती नेमली होती. त्यांनी कार्यआयोजन अंतर्गत लाकूड उद्योगावर आधारित असलेल्या उद्योगांनी एक घन मीटरमध्ये दहा झाडांची लागवड करावी, अशी सूचना केली होती. बंगळूर येथील इन्स्टिट्यूट ऑफ वुड सायन्स आणि टेक्नॉलॉजी या संस्थेने आरायंत्राजवळ लाकूड उपलब्धतेचा अहवाल येण्यापूर्वीच परवानगी दिल्याने आता आडव्या आरायंत्राचे प्रकरण उघडकीस आले आहे. त्यामुळे राज्य शासनाने केंद्रांच्या सूचनेवरून ५० आरायंत्राचे परवाने रद्द केले. आता राज्यातील आडव्या आरायंत्राची माहिती गोळा करण्याच्या सूचना प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) कार्यालयाकडून ११ वनवृत्तांना पत्र पाठवले आहे. त्यात आडव्या आरायंत्राची माहिती मागविली आहे. परवाने देताना कोणत्या निकषाचे पालन केले आहे याची तपासणी केली जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे नियमांना डावलून परवाने दिलेल्या आडव्या आरायंत्रावर कारवाईची कुऱ्हाड उचलली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com