esakal | हाथरसच्या आरोपींना दगडाने मारून मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी; जमाअत ए इस्लामी हिंदची मागणी 
sakal

बोलून बातमी शोधा

take strict action against Hathras case accused

जमाअत ए इस्लामी हिंद महिला विभागाच्या शहराध्यक्ष डॉ. सबीहा खान यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. मागील १७ वर्षांत बलात्कारच्या घटनांमध्ये दुपटीपेक्षा जास्त वाढ झाली आहे.

हाथरसच्या आरोपींना दगडाने मारून मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी; जमाअत ए इस्लामी हिंदची मागणी 

sakal_logo
By
योगेश बरवड

नागपूर:  हाथरस येथील अत्याचार व हत्या प्रकरणातील प्रत्येक आरोपीला दगडाने मारून मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात यावी, या मागणीचे निवेदन जमाअत ए इस्लामी हिंदच्या महिला विभागातर्फे आज जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना पाठविण्यात आले.

अधिक माहितीसाठी - घरात स्मार्ट टीव्ही वापरताय? तर आत्ताच व्हा सावध, अन्यथा येणार डोक्याला हात लावायची वेळ

जमाअत ए इस्लामी हिंद महिला विभागाच्या शहराध्यक्ष डॉ. सबीहा खान यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. मागील १७ वर्षांत बलात्कारच्या घटनांमध्ये दुपटीपेक्षा जास्त वाढ झाली आहे. हाथरसच्या निर्दयी हत्याकांडाने महिलांना तिव्र धक्का बसला आहे. 

या घटनेत च्या चर्चेमुळे आमच्यावर मानसिक आघात झाला आहे की, या घटनेत आरोपींनी निर्दयीपणे पीडितेची जीभ कापली व तिचा असहनीय शारीरिक छळ केल्याची चर्चा पुढे येथ असून त्यामुळे महिलांच्या मानसिकतेवर मोठा आघात झाला आहे. पीडितेचे पार्थिव कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले नाही. कुटुंबियांच्या परवाणगीशिवायच रात्रीच अंत्यसंस्कार करण्यात आला. याप्रकाराचा लाभ आरोपींना स्वत:ची सुटका करून घेण्यात होईल आणि आरोपींचे मनोबल वाढेल. 

ठळक बातमी - मुंबई- पुणे जाणाऱ्यांसाठी खुशखबर! विदर्भ, अंबा एक्स्प्रेससह तब्बल २० रेल्वेगाड्या होणार सुरु

या प्रकरणात उत्तरप्रदेश सरकार बर्खास्त करण्यात यावे. आरोपींना सहकार्य करणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही तत्काळ ताब्यात घेऊन त्यांची न्यायिक चौकशी करण्यात यावी. बलात्काराच्या घटनांना आवर घालण्यासाठी कठोर कायदे करण्यात यावे. पीडित कुटुंबाला संपूर्ण सुरक्षा प्रदान करण्यात यावी आदा मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.

संपादन - अथर्व महांकाळ