esakal | कसोटीपटू अजिंक्‍य रहाणे म्हणतो, पत्नीकडून खाद्यपदार्थ बनवायला शिकलो
sakal

बोलून बातमी शोधा

Test cricketer Ajinkya Rahane said it learned cooking

साधारण कुटुंबातील असल्यामुळे आर्थिक चणचण होतीच. पण वडील भक्‍कमपणे पाठिशी राहिल्याने प्रत्येक अडचणीवर मात करता आली. माझ्या यशात त्यांचे खरोखरच मोठे योगदान आहे, असेही रहाणे म्हणाला. 

कसोटीपटू अजिंक्‍य रहाणे म्हणतो, पत्नीकडून खाद्यपदार्थ बनवायला शिकलो

sakal_logo
By
नरेंद्र चोरे

नागपूर : लॉकडाउनचा सर्वसामान्यांसह खेळाडूंनाही जबर फटका बसला आहे. टाळेबंदीच्या काळात खेळाडूंची दिनचर्याच बदलून गेली आहे. मात्र, त्याचवेळी त्यांना कुटुंबीयांनाही वेळ देता आला. कोरोनाकाळात मुलीसोबत भरपूर खेळलो. शिवाय पत्नीकडून नवीन खाद्यपदार्थ करायला शिकलो, असे अनेक मजेशीर अनुभव व किस्से भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा उपकर्णधार अजिंक्‍य रहाणेने चाहत्यांशी "शेअर' केले. 

नागपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी (एनआयटी) आणि कोशिश फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित "कॉनफॅब विथ ऍचिव्हर्स' व्याख्यानमालिकेत तो बोलत होता. माझा जन्म संगमनेरसारख्या छोट्या गावातील एका शेतकरी कुटुंबात झाला. सात वर्षांचा असताना इतर मुलांप्रमाणे मी देखील मित्रांसोबत गल्ली क्रिकेट खेळायचो. माझ्यात व्यवसायिक क्रिकेटपटू दडला आहे, हे शेजारच्यांनी वडिलांच्या निदर्शनास आणून दिले, असेही रहाणेने सांगितले.

हेही वाचा - बीफार्म पदवीधर युवकाने केली कोरफडीची शेती अन् झाला लघुउद्योगाचा मालक...बेरोजगारांना दिला रोजगार

शेजारच्यांना सल्ला मानत वडिलांनी मला डोंबिवलीच्या द्रोणाचार्य क्‍लबमध्ये टाकले. तिथे प्राथमिक धडे गिरविल्यानंतर दहाव्या वर्षी पहिल्यांदा क्रिकेट स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली. त्यावेळी मिळविलेल्या सामनावीर पुरस्कारानंतर माझी क्रिकेटची कारकीर्द खऱ्या अर्थाने सुरू झाली. साधारण कुटुंबातील असल्यामुळे आर्थिक चणचण होतीच. पण वडील भक्‍कमपणे पाठिशी राहिल्याने प्रत्येक अडचणीवर मात करता आली. माझ्या यशात त्यांचे खरोखरच मोठे योगदान आहे, असेही रहाणे म्हणाला. 

जगभर कोरोनाचे सावट असतानाही आंतरराष्ट्रीय क्रिकेट पुन्हा सुरू झाल्याबद्दल रहाणेने आनंद व्यक्‍त केला. क्रिकेटसाठी हे चांगले संकेत आहे. त्यामुळे आता भारतीय खेळाडूही मैदानावर पतरण्यास उत्सुक आहेत. अजिंक्‍यने यावेळी चाहत्यांच्या प्रश्‍नांची उत्तरेही दिली. वेबिनारमध्ये महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अमोल देशमुख, प्रा. नरेश तवले, मनीष गायधने उपस्थित होते. संचालन अमर जाजू यांनी केले.

अधिक माहितीसाठी - महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये रविवारपर्यंत अतिवृष्टीचा इशारा

क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मटचे महत्त्व

क्रिकेटमध्ये उज्ज्वल भविष्य आहे. संधीही भरपूर आहेत. मात्र, त्यासाठी खेळावर प्रेम करणे आणि प्रामाणिकपणे कठोर परिश्रमाची गरज असते. मेहनतीच्या बळावरच मी टीम इंडियात स्थान मिळू शकलो. क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मटचे महत्त्व आहे. प्रत्येकाचा वेगवेगळा चाहता वर्ग आहे. पण कसोटी क्रिकेट सर्वाधिक आव्हानात्मक आहे, युवा खेळाडूंना सल्ला देताना अजिंक्‍य रहाणे म्हणाला. 

संपादन - नीलेश डाखोरे