esakal | कधी प्रश्‍न पडला का? सौभाग्याचे लक्षण असलेल्या बांगड्या महिला का घालतात, हे आहे उत्तर अन्‌ फायदे...
sakal

बोलून बातमी शोधा

These are the benefits of wearing bracelets read full story

शरीरावर धारण केलेल्या धातूंच्या आभूषणांमधून सतत एक ऊर्जा मिळत असते. जी आपली प्रतिकारशक्‍ती वाढविते. सोबत आत्मिक बळही देते. महिलांना शक्ती देण्याचे महत्त्वाचे काम या सोन्या-चांदीच्या दागिन्यांमधून व्हायचे. हातांची हाडे मजबूत करण्यास सोन्या-चांदीच्या बांगड्या अत्यंत महत्त्वाच्या ठरतात. शरीराला बांगड्यांचे सतत घर्षण होत असल्याने महिलांच्या शरीरात सतत ऊर्जा प्रवाहित रहायची. 

कधी प्रश्‍न पडला का? सौभाग्याचे लक्षण असलेल्या बांगड्या महिला का घालतात, हे आहे उत्तर अन्‌ फायदे...

sakal_logo
By
अतुल मांगे

नागपूर : 'पहिले कंगण सौभाग्याचे भूषण', असा मंत्र नवविवाहितेला तिची पाठवणी करताना दिला जातो. "कंकण' हे सौभाग्याचे भूषण मानले जाते. स्वाक्षण बायांच्या जीवनात बांगडीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पुरातन काळापासून स्त्रिया कंकण किंवा बांगडी घालतात. सौभाग्यवती बाईने रिकाम्या हातांनी कधीच राहू नये, असे जुने जाणते लोक सांगतात. पूर्वीच्या काळी राजस्त्रिया किंवा महाराणी सोन्याच्या, मोत्याच्या किंवा चांदीच्या बांगड्या घालत होत्या. बांगडी हा हातात घालण्याचा अलंकार. परंतु, आरोग्याच्या दृष्टीनेही त्यांचे महिलांच्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. 

बांगडी सहसा काचेची असते. प्लॅस्टिकच्या बांगड्यासुद्धा बाजारात मिळतात. लग्नाच्या वेळी वधूच्या हातात ज्या बांगड्या घातल्या जातात त्यांना वज्रचुडा म्हणतात. हा सौभाग्य अलंकार मानला जातो. तो चुडा हिरव्या रंगाचा असतो. काही ठिकाणी तो लाल रंगाचा असतो. महिलांच्या अलंकारांमध्ये बांगडीचे वेगळे महत्त्व आहे. हल्लीच्या मुली, स्त्रिया बांगड्या घालताना दिसत नाही. कामे उरकत नाही किंवा हात बंदिस्त वाटतात, अशी कारणेही त्यासाठी सांगितली जातात. परंतु, आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या बांगड्या न घातल्याने महिलांना पुढील समस्यांना सामोरे जावे लागते. 

अधिक वाचा - 'ती' म्हणाली, आता तू माझी बायको आणि माझ्या नवऱ्याचीही... 

आजकाल बहुतांश महिलांमध्ये अशक्‍तपणा, शारीरिक शक्तीचा अभाव दिसून येतो. लवकर थकवा येणे, गंभीर आजाराला सामोरे जाणे, सततचे दुखणे महिलांमध्ये दिसून येते. पूर्वीच्या काळातील महिलांना अशा समस्या नव्हत्या. पूर्वीच्या महिलांचे खान-पान तसेच त्यांचे नियम आणि संयम त्यांच्या निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली होते. शरीरावर धारण केलेल्या धातूंच्या आभूषणांमधून सतत एक ऊर्जा मिळत असते. जी आपली प्रतिकारशक्‍ती वाढविते. सोबत आत्मिक बळही देते. महिलांना शक्ती देण्याचे महत्त्वाचे काम या सोन्या-चांदीच्या दागिन्यांमधून व्हायचे. हातांची हाडे मजबूत करण्यास सोन्या-चांदीच्या बांगड्या अत्यंत महत्त्वाच्या ठरतात. शरीराला बांगड्यांचे सतत घर्षण होत असल्याने महिलांच्या शरीरात सतत ऊर्जा प्रवाहित रहायची. 

आयुर्वेदातही धातूचे अनन्यसाधारण महत्त्व

आयुर्वेदानुसार सोन्या-चांदीचे भस्म हातांमध्ये बळ व शक्ती प्रदान करते. सोन्या-चांदीच्या घर्षणामुळे शरीरात धातूचे तत्त्व निर्माण होत असते. याच कारणांमुळे पूर्वीच्या महिला दीर्घायुषी व्हायच्या. धार्मिक मान्यतेनुसार ज्या विवाहित महिला बांगड्या घालतात त्यांच्या पतीचे आयुष्य वाढते, बांगड्यांच्या किणकिणाटाने स्त्रियांच्या मनावर शुभ प्रभाव पडतो. म्हणून पूर्वी प्रत्येक स्त्रीच्या हातात बांगड्या असायच्या. अलीकडे बहुतांश महिलांच्या हातात बांगड्या नाहीत, ज्या घरामध्ये बांगड्यांची किणकिण असते, त्या घरातील नकारात्मक ऊर्जाही बाहेर फेकली जाते, असेही शास्त्रात सांगितले आहे.

सविस्तर वाचा - जिच्यावर जीव ओवाळला तिच्याच डेक्‍यावर रिव्हॉलव्हर ठेऊन तो म्हणाला 'तुला उडवू का?'

शारीरिक व्याधींपासून मुक्‍ती

भारतात नव्हे तर जगात पुरातन काळापासून स्रियांनी हातात बांगड्या घालण्याची प्रथा आहे. जसजसा काळ बदलत गेला तसतसा या संस्कृतीमध्ये बदल होत गेला. पूर्वी सोन्या-चांदीच्या बांगड्या वापरल्या जायच्या. आता काच व प्लॅस्टिकच्या बांगड्या वापरल्या जातात. स्त्रियांच्या काही रोगांवर काचेच्या बांगड्या औषध ठरतात. बांगड्या घातल्याने महिलांच्या चेहऱ्यावर तेज येते. दातदुखी, रक्तदाब कमी-जास्त होणे यावर या बांगड्यांचा अनुकूल परिणाम होतो. याशिवाय बोबडेपणा, तोतरेपणावरही बांगड्याचा उपयोग होतो, असे सांगितले जाते. बांगड्यांना धर्म आणि संस्काराशी जोडले जात असले तरी शास्त्रीयदृष्ट्या बांगड्या घालणे कधीही चांगले मानले गेले आहे.

जाणून घ्या - कशामुळे होणार बालोद्यान, जपानी गार्डन बंद..सविस्तर वाचा

हे आहेत फायदे 

  • बांगड्या घातल्याने चेहऱ्यावर तेज येते. 
  • दात दुखणे, रक्तदाब कमी-जास्त होणे यावर या बांगड्यांचा अनुकूल परिणाम होतो. 
  • बोबडेपणा, तोतरेपणावरही बांगड्याचा उपयोग होतो. 
  • बांगड्या घातल्यामुळे महिलांच्या सौंदर्यात भर पडते. 
  • बांगड्यांचे महत्त्व धर्म, संस्कारांशी जोडले असले तरी त्यास वैज्ञानिक आधार आहे.