esakal | भरदिवसा दोन तरुणींना लुटले, हजारोंचा मुद्देमाल लंपास
sakal

बोलून बातमी शोधा

thieves stolen thousands rupees from two girl in nagpur

वैशालीनगरातील रहिवासी भावना तभाने (४०) या गुरुवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास आपल्या दुचाकीने घरी जात होत्या. घराजवळ असतानाच दोन आरोपींनी त्यांची वाट अडविली.

भरदिवसा दोन तरुणींना लुटले, हजारोंचा मुद्देमाल लंपास

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : शहरात चाकूचा धाक दाखवत दोन तरुणींना लुटल्याची घटना घडली आहे. शहरातील वैशालीनगर आणि भांडेवाडी रोड भागात या घटना घडल्या असून दोन्ही प्रकरणांमध्ये पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

वैशालीनगरातील रहिवासी भावना तभाने (४०) या गुरुवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास आपल्या दुचाकीने घरी जात होत्या. घराजवळ असतानाच दोन आरोपींनी त्यांची वाट अडविली. मागे बसलेल्या आरोपीने चाकूचा धाक दाखविला. त्यांच्या गळ्यातील २५ हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी, १० हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी हिसकावून पळ काढला. 

हेही वाचा - घरी सुरू होती दिवाळीची तयारी अन् जवानाच्या वीरमरणाची बातमी आली

याचप्रमाणे गिरिजानगरातील रहिवासी जान्हवी सुखदेवे (२१) ही गुरुवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास भांडेवाडी रोड, डम्पिंगजवळ मित्रासोबत बोलत उभी होती. त्यावेळी २५ते २७ वर्षे वयोगटातील दोन आरोपी मोपेडने आले. जान्हवी व तिच्या मित्राला चाकूचा धाक दाखवत ३ हजार रुपये रोख व दोघांचेही मोबाईल हिसकावून नेले. दोन्ही प्रकरणांमध्ये संबंधित पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

हेही वाचा - Diwali Festival 2020 : लक्ष्मी मातेचे पहिले चित्र काढणारा चित्रकार आहे तरी कोण?

तरुणाचा अपघाती मृत्यू -

सीताबर्डी हद्दीत दुचाकीस्वार तरुणाचा अपघाती मृत्यू झाला. संगम टॉकीज, तिरंगा चौकातील रहिवासी शुभम भागेश्वर (२६) हा गुरुवारी मध्यरात्री त्याचा मित्र नितीन कुबडे (वय २८) याला सोबत घेऊन मानस चौकातील लोखंडी पूल परिसरातून जात होता. वळणावर दुचाकी घसरून दुभाजकाला धडकल्याने शुभम गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी मेयो रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. 

हेही वाचा - आमदार रवी राणांची दिवाळी तुरुंगात; सोळा कार्यकर्त्यांनाही सहा दिवसांची न्यायालयीन कोठडी

विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू - 

बाथरूममध्ये इलेक्ट्रिक फिटिंगचे काम करीत असताना शॉक लागून मिलननगर, वाठोडा येथील रहिवासी यश तिडके (वय १७) याचा मृत्यू झाला. उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. दोन्ही प्रकरणांमध्ये संबंधित पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.