Video : सरत्या 'मे'ने घेतला रणरणत्या उन्हाचा निरोप, पण वादळाने घातले थैमान...

 कामठी : वादळवा-याने उडालेले घराचे छप्पर.
कामठी : वादळवा-याने उडालेले घराचे छप्पर.

नागपूर (जि. ग्रामीण) : सरत्या "मे'च्या शेवटच्या दिवशी वाढलेल्या उकाड्यामुळे त्रस्त असलेल्या जनतेला रविवारी (ता.31) वादळवाऱ्यासह आलेल्या पावसाने दिलासा दिला. परंतु, वादळाने अनेक ठिकाणी उच्छाद मांडल्यामुळे अनेकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

कोराडी मार्गावर विजेचा खांब कोसळला
नागपूर-कोराडीदरम्यान महामार्गावरील मॉडर्न स्कूल पाइंटजवळ विजेचा खांब आडवा पडल्याने महामार्गावरील वाहतूक अर्धा तास विस्कळीत झाली. सायंकाळी पाचच्या सुमारास वादळासह पावसाच्या सरी बरसल्या वादळाने महामार्गावरील विजेचा खांब आडवा पडला. सुदैवाने यात कुठलीही दुर्घटना झाली नाही. परंतु, महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. अर्ध्या तासाने संबंधित यंत्रणेने विजेचा खांब बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.
हेही वाचा :(Video)माकडाचे पिल्लू  घेत आहे "ऑनलाइन' शिक्षण

कामठीत घरांची पडझड
रविवारी संध्याकाळी आलेल्या जोरदार वारा आणि पावसामुळे कामठी शहरातील प्रभाग 15 व 16 रमानगर, आनंदनगर, रामगढ, शिवनगर, विक्‍तुबाबानगर, सैलाबनगर, समतानगर, गौतमनगर, सुदर्शननगर, कुंभारे कॉलोनी भागातील गरीब लोकांच्या घरावरील छत उडून गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यात ज्वाला अमोल मेश्राम, कविता जगन्नाथ पाटील, चंदा रमेश बोरकर, पौर्णिमा सिद्धार्थ उके, प्रमिला हेमंत तिरपुडे, विद्या सुधाकर खोब्रागडे, दीपांकर गणवीर, कुंदन धर्मादास शेंडे, शांता श्रीराम अस्वले, मनीष तेजराम मेश्राम, वैशाली विनय पाटील, उषा प्रकाश धारकर, प्रणिता कमलाकर खोब्रागडे, महानंदा राजेश खोब्रागडे, सिकंदर मेश्राम, ललिता सोहनलाल यादव, सिद्धार्थ देवनाथ बोरकर, दर्शना राजू मेश्राम यांच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

शहरात तसेच रणाला व येरखेडा येथील काही भागात झाडे रस्त्यावर कोसळून पडले होते. काही ठिकाणी विद्युत विभागाचे पोल व विद्युत तारे, रस्त्याचा कडेला असलेल्या डीपी, रस्त्यावर तुटून पडल्या असल्याने शहरासह ग्रामीण भागात विद्युत प्रवाह खंडित झाला होता. ड्रॅगन पॅलेस टेम्पलची सुरक्षा भिंत कोसळली. शहरातील काही भागात घरावरील टिनपत्रे उडाल्याने झोपडपट्टी भागात राहणाऱ्या लोकांत भीतीचे वातावरण आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com