प्रवाशांनो, नागपूरमार्गे धावणाऱ्या आठ रेल्वेगाड्यांचे बदलले वेळापत्रक

योगेश बरवड
Saturday, 28 November 2020

०२८०५ विशाखापट्टणम - नवी दिल्ली विशेष रेल्वे १ डिसेंबरपासून रात्री १० वाजता विशाखापट्टणमहून रवाना होईल. दुसऱ्या दिवशी दुपारी २.१५ वाजता नागपूरला पोहोचेल आणि तिसऱ्या दिवशी पहाटे ५.४० वाजता नवी दिल्ली स्थानक गाठेल.

नागपूर : कोरोनाचे संकट गडद होत असतानाच रेल्वे सेवा पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. विशेष रेल्वेगाड्यांची संख्या सातत्याने वाढविली जात आहे. त्याचवेळी तांत्रिक कारणांमुळे रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात सुधारणा करण्यात येत आहेत. नागपूरमार्गे धावणाऱ्या आठ रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आला. 

०२८०५ विशाखापट्टणम - नवी दिल्ली विशेष रेल्वे १ डिसेंबरपासून रात्री १० वाजता विशाखापट्टणमहून रवाना होईल. दुसऱ्या दिवशी दुपारी २.१५ वाजता नागपूरला पोहोचेल आणि तिसऱ्या दिवशी पहाटे ५.४० वाजता नवी दिल्ली स्थानक गाठेल. ०२८०६ नवी दिल्ली - विशाखापट्टणम विशेष रेल्वेसुद्धा १ डिसेंबरपासून रात्री ८ वाजता नवी दिल्लीहून रवाना होईल. दुसऱ्या दिवशी सकाळी १०.३५ वाजता नागपूरला पोहोचेल आणि तिसऱ्या दिवशी पहाटे ४.१० वाजता विशाखापट्टणम स्थानक गाठेल. 

हेही वाचा - प्राणहिता नदीत वाढली परप्रांतीयांची मनमानी, तेलंगाणातील मच्छीमारांचा अहेरीतील लोकांना विरोध

०८४०५ पुरी-अहमदाबाद विशेष रेल्वे २ डिसेंबरपासून सायंकाळी ७.२० वाजता पुरीहून रवाना होईल. दुसऱ्या दिवशी दुपारी २.४५ वाजता नागपूरला पोहोचेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी ६.२५ वाजता अहमदाबाद स्थानक गाठेल. ०८४०६ अहमदाबाद-पुरी विशेष ट्रेन ४ डिसेंबरपासून सायंकाळी ७ वाजता अहमदाबादहून रवाना होईल. दुसऱ्या दिवशी सकाळी १०.५० वाजता नागपूरला पोहोचेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी ६.५५ वाजता पुरी स्थानक गाठेल. 

हेही वाचा - चांदूर बाजार नगरपालिकेची पोटनिवडणूक, भाजपचा पराभव करत...

०२६६९ चेन्नई सेंट्रल-छपरा द्विसाप्ताहिक सुपरफास्ट रेल्वे ३० नोव्हेंबरपासून सायंकाळी ५.४० वाजता चेन्नई सेंट्रलहून रवाना होईल. दुसऱ्या दिवशी सकाळी १०.२५ वाजता नागपूरला पोहोचेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी ९.३५ वाजता छपरा स्थानक गाठेल. ०२६७० छपरा-चेन्नई सेंट्रल द्वि साप्ताहिक सुपरफास्ट ट्रेन दोन डिसेंबरपासून रात्री ९ वाजता छपरा येथून रवाना होईल. दुसऱ्या दिवशी सायंकाळी ६.१५ वाजता नागपूरला पोहोचेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी ११.३० वाजता चेन्नई सेंट्रल स्थानक गाठेल. 

हेही वाचा - मध्य प्रदेशातून आंध्रात होतेय पशुधन तस्करी; कारवाईत पोलिस दिरंगाई करत असल्याचा आरोप 

०२८४३ पुरी- अहमदाबाद विशेष ट्रेन १ डिसेंबरपासून सायंकाळी ५.३० वाजता पुरीहून रवाना होईल. दुसऱ्या दिवशी दुपारी २.४५ वाजता नागपूरला पोहोचेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी ६.२५ वाजता अहमदाबाद स्थानक गाठेल. ०२८४४ अहमदाबाद - पुरी विशेष ट्रेन ३ डिसेंबरपासून सायंकाळी ७ वाजता अहमदाबाहहून रवाना होईल. दुसऱ्या दिवशी सकाळी १०.५० वाजता नागपूरला पोहोचेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी ८.०५ वाजता पुरी स्थानक गाठेल. प्रवाशांनी हा बदल लक्षात घेऊन यात्रेचे नियोजन करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: timetable of 8 railway on nagpur route is changed