एक दोन दिवसांपासून नव्हे तब्बल २ महिन्यांपासून तिरंगी छर्रा गाव आहे अंधारात; गावकऱ्यांचे प्रचंड हाल    

जगदिश सांगोडे
Thursday, 22 October 2020

गेल्या दोन महिण्या अगोदर मध्य प्रदेशातील पाऊस या अनेक गावांना कर्दनकाळ ठरला. विशेषता या गावाला ठरलेला आहे. तोतलाडोह धरणाचे संपुर्ण गेट उघडल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु होता. सदर पाणी तोतलाडोह धरणातून पेंच धरणाला जातो. 

रामटेक ( जि. नागपूर ) : उपविभागाअंतर्गय येणार्‍या तिरंगा छर्रा हा आदिवासी. पवनीपासुन २२ कि.मी. अतंरावर असलेल्या या गावाला गेल्या दोन महिन्यापासून येथिल लोकांना अंधारात जिव मुठीत घेऊन जगावे लागत आहे. संबधीत विभागाने विघुत प्रकाशाची पर्यायी व्यवस्था त्वरीत करावी,अशी मागणी जि.प.सदस्या शांताताई कुंभरे यांनी केली आहे.

गेल्या दोन महिण्या अगोदर मध्य प्रदेशातील पाऊस या अनेक गावांना कर्दनकाळ ठरला. विशेषता या गावाला ठरलेला आहे. तोतलाडोह धरणाचे संपुर्ण गेट उघडल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु होता. सदर पाणी तोतलाडोह धरणातून पेंच धरणाला जातो. 

अधिक वाचा - ब्रेकिंग : यशोमती ठाकूर यांना हायकोर्टाचा दिलासा; तीन महिन्यांच्या शिक्षेला दिली स्थगिती

त्याच नदीचा पात्रामधुन कोलीतमारा या गावातून विघुत प्रवाहानाने तिरंगी छर्रा या गावाला जोडण्यात आले आहे. पाऊण कि.मी.अंतर असलेल्या या नदीचा पात्रामध्ये चार विघुत खांब उभे करुन विघुत लाईन जोडण्या आलेली आहे. या मोठ्या प्रमाणात पाण्याच्या विसर्गात काही खांब वाहुन गेली.तर काही वाकल्या मुळे येथिल विघुत पुरवठा पुर्णत: खंडीत झालेला आहे. त्यामुळे येथिल दिडशे नागरिकांना संपुर्ण रात्र अंधारात भिती पोटी काढावे लागत आहे. वनसंपदाने नटलेल्या या गावाला वन्यप्राणी सभोताल संचार करीत असतात.

नंदीच्या पात्रात अघावत पाण्याच्या प्रवाह जोरात सुरु आहे. बारामाही या पात्रात पाणी वाहत असते. त्यामुळे कोलीतमारा येथे येणे जाणे करीता नावेचाच आधार येथिल नागरिकांना घ्यावे लागते. सघपरिस्थिती पाहता, महाविज वितरण विभागाचे उपविभागीय अधिकारी अभियंता आशिष तेजे शाखा अभियता अजिंक्य मोहुर्ले. जि.प. सदस्या शांताताई कुंभरे यांनी दि.१९ आँक्टोंबर सदर गावाला भेट देवून बोट द्वारे नदिचा पात्रात असलेल्या विघुत लाईन ची पाहणी केली.

पात्रात पाण्याच्या प्रचंड प्रवाह असल्यामुळे अघावत विघुत लाईनचे काम दुरस्त करणे शक्य नसल्याचे दिसून आलेले आहे. त्यामुळे पाण्याच्या प्रवाह जो पर्यत कमी होणार नाही. तो पर्यत नागरिकांना अंधारातच राहावे लागणार आहे. महसुल विभागाने मानवतेच्या दुष्टीकोनातून पुढे यावे, पर्यायी व्यवस्था म्हणून जनरेंटर, मातीचे तेल आदी साहित्या पुरवठा येथिल नागरिकांना पुरविण्यात यावे .जेणे करुन त्यांना उजेडाचा आधार मिळेलअशी व्यवस्था करावी,अशी मागणी जि.प.सदर्‍या शांताताई कुंभरे यांनी बोलतांना व्यक्त केली आहे.

सविस्तर वाचा - अर्ध्यारात्री बोलावले तरी यावेच लागेल!, श्रीमुखात लगावली

सदर गाव ना ईकडे ना तिकडे चा गंभीर अवस्थेने येथिल वास्तव्याला असलेल्या नागरिकांचे बेहाल झालेले आहे. सदर गाव पेंच व्राघ प्रकल्पा अंतर्गत येतो. पारशिवनी प.स. अंगर्तग येणार्‍या कोलीतमारा ग्रा.पं. मध्ये तर. रामटेक तालुक्यातील प्रा.आरोग्य केन्द्र हिवरा बाजार मध्ये येतो. अशी या गावची दुरावस्था आहे 

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tirangi chharra village has no electricity from last 2 months