कोराडी येथे सहा वर्षीय बालिकेवर अत्याचार; आरोपीला अटक

सतीश दहाट
Tuesday, 6 October 2020

कोराडी पोलिसांनी आरोपीचे मेडिकल करायला पाठवले असून, तो बालीग की नाबालीग हे मेडिकल रिपोर्ट आल्यावरच माहित होईल. त्यानंतर आम्ही आरोपीस कोर्टात हजर करून पीसीआर मागू, अशी माहिती एपीआई चव्हाण यांनी दिली.

कामठी (जि. नागपूर) : जिल्ह्यातील महादुला नगरपंचायत येथे असलेल्या भीमाईनगर झोपडपट्टी वस्तीतील एका सहा वर्षीय चिमुकलीवर नराधमाने बलात्कार केला. ही घटना कोराडी पोलिस ठाण्याअंतर्गत घडली.

मुलीच्या आईने कोराडी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, सायंकाळी तिची मुलगी लघुशंकेसाठी गेली असता कपड्यांवर रक्ताचे डाग दिसले. याबाबत आईने मुलीला विचारले असता दिनेश मोरढवरे (वय २०) याने त्याच्या घरी खेळायला नेले. त्याने गुप्तांगात काहीतरी घातले म्हणून वेदना होत असल्याचे सांगितले. मुलीची आई भांडे घासायला कोराडी कॉलनीत जाते. ती कामावर गेली असताना ही दुर्देवी घटना घडली.

अधिक वाचा - निष्काळजीपणाचा कळस! पती कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतरही नेले घरी; दुसऱ्या दिवशी मृत्यू होताच पत्नीविरुद्ध गुन्हा

या घटनेची माहिती मिळताच आरोपी नराधम युवकास परिसरातील नागरिकांनी मारले. त्यानंतर कोराडी पोलिसांना बोलावून त्याला अटक करण्यात आली. कोराडी पोलिसांनी आरोपीचे मेडिकल करायला पाठवले असून, तो बालीग की नाबालीग हे मेडिकल रिपोर्ट आल्यावरच माहित होईल. त्यानंतर आम्ही आरोपीस कोर्टात हजर करून पीसीआर मागू, अशी माहिती एपीआई चव्हाण यांनी दिली.

‘अगर मेरे लडके ने ये घिनौनी हरकत किया हो तो कानकुन उसे सजा मिलनी चाहिए. किसी के भी बच्ची के साथ दिनेशने किया पाप ठीक नही. एक साल मे उसकी शादी करके देनेवाली थी मैं’ असे शांती मोरढवरे यांनी सांगितले. संबंधित बलात्काराच्या घटनेचा कोराडी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वजिर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआई चव्हाण मैडम पुढील तपास करीत आहे.

हेही वाचा - एअर हॉस्टेसवर प्रियकराने केला बलात्कार

दिनेश दारुड्या, गुंड प्रवृत्तीचा

दिनेश हा १९-२० वर्षांचा आहे. त्याला दारूचे व्यसन असल्याने आईशी पटत नाही. दिनेशची आई शांती मोरढवरे ही पिटेसूर गिट्टीखदान येथे राहते. दिनेशने आईलासुद्धा दोनदा मारहाण केली होती. तेव्हापासून त्याची आई भिमाईनगर येथे राहत नसून पिटेसूर येथे राहते. तिच्या मुलाला लोकांनी मारले आणि पोलिस स्टेशन कोराडी येथे नेल्याचे नागरिकांनी सांगितले. आई शांती माहिती खरी आहे की खोटी हे माहित करून घेण्यासाठी आली होती. शांती मोरढवरे ही बालाघाट मध्यप्रदेशातील पिलपेवाडा येथील खास रहिवासी आहे.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Torture of a six year old girl at Koradi