उपचार खासगीत, मृत्यू मेयो-मेडिकलमध्ये; खासगीतून रेफर कोरोनाबाधितांचे ८० टक्के मृत्यू

Treatment in private hospital and death in Mayo Medical Nagpur corona update
Treatment in private hospital and death in Mayo Medical Nagpur corona update

नागपूर : खासगी रुग्णालयांना कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यास परवानगी मिळाली. खासगी रुग्णालये उपचार करू लागली. मात्र, रुग्ण गंभीर झाल्यानंतर मेडिकल, मेयोत रेफर करण्यात येणाऱ्या रुग्णांची संख्या प्रचंड वाढली आहे. विशेष असे की, खासगीत मृत्यूचा टक्का वाढलेला दिसू नये म्हणून रुग्णवाहिकेमधून नातेवाइकांसह मेयो-मेडिकलमध्ये सोडण्यात येते. 

लवकर बरे व्हावे, या हेतूने अनेक कोरोनाबाधित खासगीतील उपचाराला पसंती देतात. परंतु, खासगीत उपचार करताना पैसा संपल्यानंतर मात्र रुग्णाला गंभीर स्थितीत मेडिकल-मेयोत रेफर केले जाते. रुग्णाची स्थिती गंभीर झाल्यानंतर मृत्यू मात्र मेयो-मेडिकलमध्ये होतो. मागील आठवडाभर मध्यरात्री एका रुग्णालयातून दर दिवसाला कोरोनाचा एक रुग्ण रेफर करण्यात येत होता. त्या रुग्णाचा पुढे अवघ्या काही तासांमध्ये किंवा एक दिवसानंतर मृत्यू होत होता.

खासगीत रुग्ण पोहोचताच पोहोचविणाऱ्यास ‘कमिशन’ मिळते. रुग्णाकडून अधिकचे पैसे घेऊन उपचार सुरू होतात. रुग्णाजवळचे पैसे संपल्यानंतर मात्र शहरातील अनेक खासगी रुग्णालये पुन्हा मेडिकलमध्ये रेफर करतात. कोरोना काळात मेडिकल आणि मेयोतून सुमारे ५०० वर बाधितांना रेफर करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यातील ८० टक्के बाधितांचा मृत्यू २४ किंवा ४८ तासांमध्ये झाला आहे. 

मेडिकलमध्ये रुग्णांची पळवापळवी नवीन नाही

मेडिकल आणि मेयो परिसरात खासगी रुग्णालयांचे एजंट रुग्ण पळविण्यासाठी तैनात असतात. रात्रीअपरात्री रुग्ण मेडिकल-मेयोत आला की, येथे उपचार होत नसल्याचे कारण सांगत खासगीत रुग्ण पळविण्यात येतात.

सरकारी रुग्णालय आहे

एखाद्या डॉक्टरने खासगीतून रेफर झालेल्या रुग्णाला दाखल करून घेण्यास उशीर केला किंवा दाखल करण्यास नकार दिला तर मात्र नातेवाइकांकडून सरकारी रुग्णालय प्रशासनावर ताशेरे ओढले जातात. सरकारी रुग्णालय आहे, याची आठवण करून देतात. मात्र, खासगीत लाखो रुपये खर्च करूनही रुग्‍ण बरा होत नाही, याबाबत ‘ब्र’ही काढत नसल्याची प्रतिक्रिया येथील तज्ज्ञाकडून व्यक्त करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com