हे काय, मतमोजणीतील गैरप्रकाराची आडिओ क्‍लिप "व्हायरल'?

sakal
मंगळवार, 21 जानेवारी 2020

भिवापूर (जि.नागपूर) :  तास पंचायत समिती गणातील मतमोजणीला उपस्थित कर्मचारी एका आडिओ क्‍लिपने अडचणीत आले आहेत. मतमोजणीत गैरप्रकार केल्याचा त्यांच्यातील संवाद यातून उघडकीस आला आहे. तोच आधार घेऊन पराभूत अपक्ष उमेदवार छाया ढोणे यांनी आपल्या पराभवासाठी संगनमताने केलेला हा राजकीय कट असल्याचा आरोप बुधवारी (ता.15) पत्रकार परिषदेतून केला.

क्‍लिक करा : दुनिया चकाचौंध की दिवानी भई

अपक्ष उमेदवार छाया ढोणे यांचा आरोप

या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, शेंडे यांचा विजय रद्द करून त्यांच्याऐवजी मला विजयी घोषित करण्यात यावे, अशी मागणी ढोणे यांनी तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी अनिरुद्ध कांबळे यांना भेटून केली. यावेळी विजयी उमेदवारावरील आक्षेपाचे निवेदन त्यांनी तहसीलदारांना दिले. निवेदनाच्या प्रती निवडणूक आयोग, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आल्यात. यासंदर्भात न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे ढोणेंनी सांगितले.

क्‍लिक करा :आईने बाळाला वॉकरमध्ये ठेवले अन झाला घात

"घाटउमरी गेली पाण्यात ' या सांकेतिक भाषेचा वापर
ढोणे 10 मतदान केंद्रांवर विजयी उमेदवाराच्या तुलनेत अर्ध्यापेक्षा अधिक मताने आघाडीवर आहेत. शेवटच्या टप्प्यातील काही मतदान केंद्रांवर मतांची अदलाबदल करून माझा पराभव करण्यात आला, असा त्यांचा दावा आहे. त्यासाठी या आडिओ क्‍लिपचा आधार घेत त्यांनी एका मतदान केंद्रावर आपल्याला मिळालेल्या मताची संख्या 97 वरून 67 वर आणण्यात आली, असे सांगितले.घाटउमरी पुनर्वसन मतदान केंद्रावरील मतमोजणीत अशीच गडबड केली. हे सांगण्यासाठी "घाटउमरी पाण्यात गेली' या सांकेतिक भाषेचा वापर या आडिओ क्‍लिपमध्ये आहे. याशिवाय इतर आयुधे आपल्या पराभवासाठी वापरली गेली, असे त्या म्हणाल्या. तास पंचायत समिती गणात येणाऱ्या परसोडी गावातील मतदारांची नावे भिवापूर शहर व तास गणातील नक्षी मतदान केंद्राच्या मतदार यादीत समाविष्ट आहेत. त्यांनी भिवापूर नगरपंचायतीच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला होता. त्यामुळे ते तास पंचायत समिती गणाच्या निवडणुकीत मतदान करायला अपात्र ठरतात. मात्र प्रशासनाने मतदार याद्या अद्ययावत न केल्याने त्यांना मतदानाची संधी मिळाली. हा नियमबाह्यपणाचा प्रकार असल्याचा आरोपही त्यांनी केला.

क्‍लिक करा :  ते पोहचवणार जगभरात महात्मा गांधींचा संदेश
या आडिओ क्‍लिपमध्ये आवाज रेकॉर्ड झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांची उच्चस्तरीय चौकशी करून कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. पत्रकार परिषदेला छाया ढोणे, वसंतराव ढोणे, जोगेंद्र सरदारे उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Voting malicious audio clip "viral"?