का झाले दोनशे शिक्षकांवर फौजदारी गुन्हे दाखल?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

हे काम करण्यास शिक्षकांनी विरोध दर्शवून प्रशिक्षणाला गैरहजेरी लावली होती. यानंतर शिक्षकांनी बीएलओचे काम करण्यास नकार दिला.

हिंगणा (जि.नागपूर) : निवडणुकीच्या कामांमध्ये हयगय केल्याप्रकरणी दोनशे शिक्षकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले. तहसील प्रशासनाच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे शिक्षकांमध्ये खळबळ उडाली आहे.

क्‍लिक करा  : मुख्याध्यापिका पत्नी करायची मारहाण,अपमान असहय झाल्याने पतीचा राग झाला अनावर...

आदेश धुडकावले
निवडणूक आयोग नवी दिल्ली व राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदारयाद्या "अपडेट' करण्याचे काम बीएलओमार्फत करण्यात यावे, असे आदेश जारी करण्यात आले होते. यानुसार तहसीलदार संतोष खांडरे यांनी बीएलओ म्हणून तालुक्‍यातील 233 शिक्षकांची नियुक्ती केली. यासाठी काही महिन्यांपूर्वी तहसीलमध्ये प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. हे काम करण्यास शिक्षकांनी विरोध दर्शवून प्रशिक्षणाला गैरहजेरी लावली होती. यानंतर शिक्षकांनी बीएलओचे काम करण्यास नकार दिला.
क्‍लिक करा  : वडिलांच्या सक्‍तमजुरी शिक्षेला मुलाचीच साक्ष
 

निवडणुकीच्या कामात हयगय भोवली
हिंगणा तालुक्‍यात केवळ 15 ते 20 शिक्षकांनी बीएलओचे काम सुरू केले. तहसीलदार संतोष खांडरे यांच्या निर्देशानुसार नायब तहसीलदार मेश्राम यांनी 5 फेब्रुवारी रोजी बीएलओचे काम नाकारणाऱ्या दोनशे शिक्षकांविरुद्ध तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार दोनशे शिक्षकांवर लोकप्रतिनिधी अधिनियम 1950 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिस उपनिरीक्षक मल्हार डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Why two hundred teachers have been charged with criminal offenses?