ब्रेकींग ग्रामीण : निलडोह-अमरनगरची होईल का "धारावी', इसासनी कनेक्‍शन' कारणीभूत --

अजय धर्मपुरीवार
गुरुवार, 11 जून 2020

इसासनी भीमनगर येथे 70 वर्षीय वृद्ध सुरवातीला कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्याचा जावई हासुद्धा घराजवळ राहत असल्याने बुधवारी त्याचा अहवाल "पॉझिटिव्ह' आला. त्याच्या सोबत अमरनगर येथील निलडोहच्या महिला सरपंचांचे 40 वर्षीय पती एमआयडीसीतील एकाच कारखान्यात नोकरी करत होते. काही दिवसांपासून तो आजारी होता. त्याच्यावर परिसरातील दोन डॉक्‍टरांनी उपचार केले, परंतु आराम न झाल्यामुळे त्याला एम्समध्ये भरती करण्यात आले होते

हिंगणा (जि.नागपूर) : ईसासनी भीमनगर येथे 7 रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्यापैकी एकाच्या संपर्कात आल्याने निलडोह ग्रामपंचायत सरपंचाचे पती गुरूवारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. इसासनीच्या रुग्णाची साखळी अमरनगर या कामगारबहुल भागात पोहचल्याने प्रशासन चांगलेच हादरले आहे.

हेही वाचा : दगडी चाळीतून खासगी गाडीने नागपूरकडे निघाला "डॅडी', मात्र शहरात पोहोचताच...

एकूण 14 लोकांना जणाना क्वांरटाईन
इसासनी भीमनगर येथे 70 वर्षीय वृद्ध सुरवातीला कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्याचा जावई हासुद्धा घराजवळ राहत असल्याने बुधवारी त्याचा अहवाल "पॉझिटिव्ह' आला. त्याच्या सोबत अमरनगर येथील निलडोहच्या महिला सरपंचांचे 40 वर्षीय पती एमआयडीसीतील एकाच कारखान्यात नोकरी करत होते. काही दिवसांपासून तो आजारी होता. त्याच्यावर परिसरातील दोन डॉक्‍टरांनी उपचार केले, परंतु आराम न झाल्यामुळे त्याला एम्समध्ये भरती करण्यात आले होते. गुरुवारी पहाटे त्याची कोरोनाची चाचणी "पॉझिटिव्ह' आली. त्याच्या संपर्कात अमरनगर परिसरातील एकूण 14 लोकांना जणाना क्वांरटाईन करण्यात आले आहे. यात दवाखान्यात नेणारा ऑटोचालक, दोन सोबती कामगार, नातेवाइक, घर शेजारी यांचा समावेश असून स्थानिक प्रशासनातर्फे परिसरात फवारणी करण्यात आली.

आणखी वाचा : ब्यूटी पॉर्लर बंद आहेत !घरीच वाढवा सौंदर्य

संपर्कात आलेल्यांची शोधमोहिम जोरात
तालुका आरोग्य अधिकारी प्रवीण पडवे, डॉ.सुरेखा सेलोकर आदी सर्व वैद्यकीय विभागाचे अधिकारी व कर्मचारी या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीचा शोध घेत आहेत. भीमनगर व अमरनगर येथील लोकसंख्या मोठ्‌या प्रमाणात आहे. दाट लोकवस्ती आहे. त्यासाठी हा आजार पसरु नये, यासाठी रुग्णाच्या संपर्कात येणा-यांनी समोर येण्याचे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.पडवे यांनी केले आहे.

आणखी वाचा : काटोलमध्ये शिक्षणाची गंगा प्रवाहित करणारे सुनील शिंदे

नागरिकांनो, स्वतःहून समोर या !
तहसिलदार संतोष खाडरे, खंडविकास अधिकारी महेद जुवारे, पोलिस निरीक्षक हेमंत खराबे
परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. ईसासनी, निलडोह, डिगडोहचे ग्रामविकास अधिकारी एन. एम. निमजे, गुणवंत चिमोटे, किशोर अलोने यांनी दररोज परिसरात सॅनिटायझर फवारणी करण्याचा सुचना दिल्या असून बाहेर गावून येणा-या व्यक्तीने ग्रामपंचायत प्रशासनाला सूचना देण्याची विनंती नागरिकांना केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Will Nildoh-Amarnagar be "Dharavi",