महिलांनी स्थापन केली शेतकरी उत्पादन कंपनी; संघटनातून सिद्ध केला हेतू

Women founded a farmers production company
Women founded a farmers production company

उमरेड (जि. नागपूर) : बेभरवश्याचे वातावरण, शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक, व्यापाऱ्यांकडून होणारे खच्चीकरण, खर्च जास्त उत्पादन कमी, कर्जाचा डोंगर व मन सुन्न करून जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या. या सर्व विषम परिस्थितीची दखल घेऊन उमरेड येथील काही महिला एकत्रित आल्या. त्यांनी एका शेतकरी उत्पादन कंपनीची स्थापना केली. कंपनीच्या स्थापनेचा मुख्य उद्देश आर्थिक बळकटी, सक्षम व स्वयंसिद्ध शेतकरी होणे हा आहे. हे सगळे साध्य करण्यास नगदी पिकांचे उत्पादन, शेतमालांवर प्रक्रिया, योग्य व्यवस्थापन, बाजारपेठ, खर्चाच्या दुप्पट भाव याला आळा घालण्यासाठी शेतकऱ्यांच्या धुऱ्यावर साहित्य उपलब्ध करून देण्याचा त्यांचा मानस आहे. 

पुढील उद्दिष्ट ठेवून कार्य करण्याचे कंपनीच्या सिईओ वर्षाताई बावनकुळे यांच्याकडून सांगण्यात आले. संघटीत शेतकरी, शेतीचे व्यावसायिक स्वरूप, शेतीत प्रगत तंत्रज्ञानाचा वापर, मजुरीचा कमीत कमी खर्च, उच्च दर्जाच्या शेतमालाच्या उत्पादनास मार्गदर्शन, शेतमालास योग्य बाजारपेठ व भाव, शेतमालावर आधारीत गृहउद्योग, भिवापुरी मिरचीला गतवैभवाची प्राप्ती,

उमरेडच्या सावजी मसाल्यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ, तेलवर्गीय पिकांच्या लागवडीला प्रोत्साहन, शेतीला वारंवार लागणारी खते, बी-बियाणे, कीटकनाशके इत्यादी रास्त दरात उपलब्ध करून देणे, तसेच ‘विकेल ते पिकेल’ हे तत्व प्रत्येक धुऱ्यावर राबविणे यावर विशेष भर देणार आहे.

परिसरातील भूमीपुत्रांच्या सहकार्याने येत्या काळात उद्दिष्ट गाठून कंपनी लवकरच आपल्या स्वप्नपूर्तीकडे वाटचाल करेल यात काही शंका नाही, असे कंपनीच्या अध्यक्षा रंजनाताई रेवतकर यांनी मत व्यक्त केले. निर्मलमाई शेतकरी उत्पादन कंपनीचे भागधारक, सभासद नोंदणी सुरू करण्यात आली आहे. इच्छुक भूमिपुत्रांनी निर्मलमाईचे सभासद बनून शेतकऱ्यांना आर्थिक संपन्न बनविणाऱ्या ह्या चळवळीत सहभाग घेण्याचे आवाहन कंपनीच्या सचिव निलीमताई रेवतकर यांनी केले. कंपनीच्या स्थापनेस कृषी विभागाचे विशेष सहकार्य लाभले.

याप्रसंगी उद्घाटनप्रसंगी माजी नगराध्यक्ष सुमनताई इटनकर, गंगाधर रेवतकर, विदर्भ अग्रीकल्चर फेडरेशनचे सचिव अनिल नौकरकर, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष गजानन झाडे, पणन महासंघाचे सदस्य विजय खवास आदी उपस्थित होते. कळमनाचे सरपंच चंद्रशेखर तोडसे, ग्रामपंचायत सदस्य व मोठ्या संख्येने परिसरातील शेतकरी उपस्थितीत होते. संचालन आस्था बेले यांनी केले. आभार हेमाताई पोटदुखे यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com