‘त्या’ प्रेयसीला अटक; विचित्र पद्धतीच्या ‘संबंधा’मुळे गेला होता प्रियकराचा जीव

दिलीप गजभिये
Monday, 11 January 2021

लॉज कर्मचाऱ्यांनी खोलीत धाव घेतली. जियाउद्दीन मृतावस्थेत दिसल्याने त्यांनी खापरखेडा पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नागपूर येथील शासकीय रुग्णालयात रवाना केला.

खापरखेडा (जि. नागपूर) : ‘पॉर्न क्लिप’ पाहून संभोग करणे प्रियकराच्या जिवावर बेतले. गळ्याभोवती दोरीचा फास आवळला गेल्याने त्याचा मृत्यू झाला. दहेगाव रंगारी येथे ही घटना उघडकीस आली. जियाउद्दीन (वय २७, रा. टेकानाका, नागपूर) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी प्रेयसीला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जियाउद्दीन हा अभियंता असून, बेरोजगार होता. २५ वर्षीय तरुणी एका खासगी कंपनीत काम करते. दोघांमध्ये अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते. जियाउद्दीन हा तरुणीला घेऊन दहेगाव रंगारी येथे आला. परिसरात असलेल्या एका लॉजमध्ये खोली भाड्याने घेतली. त्यांनी मोबाईलवर अश्लील चित्रपट बघितला. यानंतर चित्रपटातील दृश्याप्रमाणे संभोग करण्याचे ठरविले.

नागपूर जिल्ह्यातील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा

तरुणीने त्याचे हातपाय दोरीने बांधले. गळ्याभोवती दोरी आवळली. संभोग केल्यानंतर तरुणी बाथरूममध्ये गेली. दरम्यान, तो खुर्चीवरून पडला. त्यामुळे गळ्याभोवती फास आवळून त्याचा मृत्यू झाला. काही वेळाने तरुणी बाथरूममधून बाहेर आली. जियाउद्दीनने काहीही प्रतिसाद न दिल्याने तिने आरडाओरड केली.

लॉज कर्मचाऱ्यांनी खोलीत धाव घेतली. जियाउद्दीन मृतावस्थेत दिसल्याने त्यांनी खापरखेडा पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नागपूर येथील शासकीय रुग्णालयात रवाना केला. तरुणीच्या माहितीवरून खापरखेडा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पोलिस उपनिरीक्षक सूर्यप्रकाश मिश्रा पुढील तपास करीत होते.

नक्की वाचा - भंडारा रुग्णालय आग : शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांबाबत समोर आली धक्कादायक माहिती

मृत्यूनंतर अनेक तर्क-वितर्क

मृत व तरुणीचे पाच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. कुटुंबीयांनी लग्नाची परवानगी नाकारल्याने दोघांनीही मागील वर्षी प्रेम विवाह केला होता. ज्यामुळे दोघांनाही इतरत्र भटकंती करावी लागत होती. विशेष म्हणजे दोघांनाही मोबाईलवर सेक्स संबंधित पॉर्न क्लिप बघण्याचा भयावह छंद असल्याने तरुणाला जीव गमवावा लागला. युवकाच्या मृत्यूनंतर अनेक तर्क-वितर्क लावले जात आहे.

तरुणाचा मृत्यू की हत्या?

मृत नग्न अवस्थेत होता. मृतकाचे हातपाय बांधलेले होते. गळ्याच्या भागालाही बांधण्यात आले होते. अचानक तरुणी बाथरूममध्ये गेली. दरम्यान, मृतकाचा तोल जावून खुर्चीवरून पडला. त्याला बांधण्यात आलेल्या रस्सीने गळ्याला फास लागला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, हातपाय बांधून असणाऱ्या विचित्र घटनेत तरुणाचा मृत्यू की हत्या? अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे.

जाणून घ्या - काचाच्या भिंतीतून बघितला मुलीचा चेहरा; ‘बेबी ऑफ सुकेशनी आगरे’ असे उच्चारले अन् हृदयाचा ठोका चुकला

वडिलांच्या तक्ररीवरून गुन्हा दाखल

दोघांच्या लग्नाला कुटुंबीयांचा विरोध होता. यामुळेच मुलीने आपल्या मुलाला लॉजमध्ये नेऊन खून केल्याचा आरोप मृताच्या वडिलांनी केला. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून प्रेयसीला अटक केली आहे.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Young man dies after being strangled in lodge Nagpur crime news