गॅंगस्टर बनने हे कुणाचे ध्येय असू शकते का? वाचा काय आहे गोळीबार मागील कारण

अनिल कांबळे
Friday, 18 September 2020

चिडलेल्या आरोपींनी दादागिरी दाखविण्यासाठी पलाशला मारहाण केली. पलाश त्यांना धमकी देऊन निघून गेला. आरोपींनी वचपा काढण्यासाठी पाठलाग करून पलाशचे घर गाठले. पलाशचा भाऊ प्रितेश राजू पाटील (२६) घराबाहेर आला. त्याने युवकांना जाब विचारला.

नागपूर : जग कोरोनाच्या दहशतीत असताना कुणाला आपली दहशत पसरवावी, अस वाटत असेल तर त्याला काय म्हणावे? गॅंगस्टर बनने हे कुणाचे ध्येय असू शकते का, असा प्रश्‍न उपस्थित करणारी घटना शहरात घडली. एका युवकाला गॅंगस्टर बनायचे आहे, म्हणून त्याने बेछूट गोळीबार केला. या युवकाला पाच साथीदारांसह पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पलाश राजू पाटील (रा. अहुजानगर, हुडको कॉलनी) रविवारी रात्री कारने घरी जात होता. मिसाळ ले-आउटमध्ये आरोपी पूनेश ठाकरे, मनोज कहाळकर, प्रज्ज्वल शामराव पौनीकर, शुभम राजू नरांजे, आसिफ कुरेशी आणि अन्य दोन १७ वर्षांची मुले रस्त्यात दुचाकी लावून मस्ती करीत होते. कार काढण्यासाठी जागा नसल्यामुळे पलाशने त्यांना ‘अबे समजता नही क्या?, ये जगा है क्या बात करणे की, गाडी बाजू करो’ असे हटकले.

हेही वाचा - चक्‍क देवीसमोर गुडघे टेकले होते कट्टर इस्लाम मानणारा बादशहा औरंगजेबाने! वाचा कुठे आहे मंदिर

चिडलेल्या आरोपींनी दादागिरी दाखविण्यासाठी पलाशला मारहाण केली. पलाश त्यांना धमकी देऊन निघून गेला. आरोपींनी वचपा काढण्यासाठी पाठलाग करून पलाशचे घर गाठले. पलाशचा भाऊ प्रितेश राजू पाटील (२६) घराबाहेर आला. त्याने युवकांना जाब विचारला.

दरम्यान, एकाने पिस्तूल काढून दोन ते तीन गोळ्या झाडल्या. त्यात प्रीतेश जखमी झाला. यानंतर आरोपींनी तोडफोड केली. पलाशच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मंगळवारी दुपारी पाच आरोपींना अटक केली आणि पीसीआर घेतला.

अधिक माहितीसाठी - ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये तब्बल ५ कोटी जिंकलो आणि आयुष्य झाले खडतर" स्वतःच सांगतोय करोडपती सुशील कुमार..वाचा सविस्तर

वर्षभरापासून गुन्हेगारीत सक्रिय

जरीपटक्यातील गोळीबार घटनेतील आरोपी पुनेश ठाकरे हा वर्षभरापासून गुन्हेगारीत सक्रिय आहे. त्याला गुंडांची गॅंग तयार करून गॅंगस्टर बनायचे आहे. त्यामुळे त्याने उत्तरप्रदेशातून पिस्तूल विकत आणली तर नागपुरातून तलवार, चाकू व कुकरी विकत घेतले. तसेच टोळी तयार केली. आता फक्त एखाद्याचा गेम करून ‘फ्लॅश’मध्ये यायचे होते. त्यासाठीच पुनेशने गोळीबार केल्याची माहिती आहे. जरीपटक्यातील हुडको कॉलनीत झालेल्या गोळीबार प्रकरणात पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली. दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून बंदुकीसह धारदार शस्त्रे जप्त करण्यात आली.

क्लिक करा - ते लांब बसून रडत होते; काही नागरिक बघून निघून गेले, पडाटे आले सत्य समोर

पोलिस पोहोचण्यापूर्वीच युवकांनी काढला पळ

चिडलेले युवक परिसरात आरडाओरड करीत होते. यावेळी सुजान नागरिकाने पोलिसांना सुरू असलेल्या प्रकरणाची माहिती दिली. मात्र, पोलिस घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच युवकांनी पळ काढला. जखमी रितेशला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेनंतर मोठा जमाव जरीपटका पोलिस ठाण्यात पोहोचला होता.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: young man fired to become a gangster