रेल्वे विलंबाने; तुम्ही याच मार्गाने जाताय का?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

रेल्वे गाड्यांचा विलंबाने जाण्याचा काही दिवसापासूनचा क्रम सुरूच आहे. परिणामी रेल्वेस्थानकावर तासंतास रेल्वे प्रवाशांना वाट पाहत राहावे लागत आहे. त्यामुळे प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

अकोला : रेल्वे गाड्या उशिरा धावण्याचे सत्र अजूनही कायम आहे. धुक्यांच्या समस्येमुळे उत्तरेकडून येणाऱ्या रेल्वे गाड्यांची गती कमालीची मंदावली आहे. नियोजित स्थळी पोहोचण्यात उशीर होत असल्याने परतीचा प्रवासही विलंबाने सुरू आहे. बुधवारी अकोला स्थानक मार्गे जाणाऱ्या जवळपास डझनभर गाड्या वेळेपेक्षा उशिरा धावत असल्याने प्रवाशांना चांगलाच फटका बसला.

12286 हजरत-निजामुद्दीन सिकंदराबाद दुरंतो एक्सप्रेस सर्वाधिक 6.45 तास उशिराने धावत होती. त्यापाठोपाठ 12622 नवी दिल्ली चेन्नई-तामिळनाडू एक्सप्रेस 3.3 तास 12592 यशवंतपूरम-गोरखपुर एक्सप्रेस 3.3 तास, 12722 नवी दिल्ली-हैदराबाद दक्षिण एक्सप्रेस 2.3, 12214 सराई रोहिल्ला-यशवंतपूरम दुरंतो एक्सप्रेस 2.15 तास, 11045 धनाबाद-मुंबई दिक्षाभुमी एक्सप्रेस दोन तास.

सविस्तर वाचा - वंचितच्या बंदचा भाजप आमदाराला फटका

याही गाड्या उशिरा
22352 यशवंतपूर-पाटलीपुत्र एक्सप्रेस दोन तास, 16094 लखनऊ-चेन्नई एक्सप्रेस दोन तास, 12650 हजरत निजामुद्दीन-यशवंतपुरम संपर्कक्रांती एक्सप्रेस दीड तास, 12864 कोठी एक्सप्रेस दीड तास, हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस एक तास उशिरा धावत होती. रेल्वे गाड्यांचा विलंबाने जाण्याचा काही दिवसापासूनचा क्रम सुरूच आहे. परिणामी रेल्वेस्थानकावर तासंतास रेल्वे प्रवाशांना वाट पाहत राहावे लागत आहे. त्यामुळे प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

क्लिक करा - मुख्याधिकारी व उपनगराध्यक्ष यांच्यात शाब्दिक चकमक

महाराष्ट्र दोन तास विलंबाने
येथील मध्यरेल्वेच्या अकोला स्थानकावरून धावणारी 11039 क्रमांकाची कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस ही नियोजित वेळेपेक्षा (11.30 वाजता) दोन तास विलंबाने येथील मध्य रेल्वेच्या स्थानकावरील फलाट क्रमांक दोनवर आल्याने प्रवाशांनी रेल्वे विभागाविरुद्ध रोष व्यक्त केला. अकोला स्थानकावरूच ही गाडी दोनदास विलंबाने पोहोचल्यावर मूर्तिजापूर, बडनेरा, वर्धा या स्थानकावर गाडी विलंबाने पोहोचल्याची माहिती आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 12 train delayed