esakal | शिरपूर पोलिसांनी आवळल्या दारूतस्करांच्या मुसक्‍या, 22 लाखांचा मुद्देमाल जप्त
sakal

बोलून बातमी शोधा

22 lakh rupees seized from liquor smuggler in wani of yavatmal

शिरपूर पोलिस ठाण्याचे ठाणेदार सचिन लुले यांनी दारूमाफियांच्या मुसक्‍या आवळण्याचे धोरण अवलंबल्याचे दिसत आहे. मागील दीड महिन्यात अवैध दारूची तस्करी व वाहतूक करणाऱ्या 45 जणांवर गुन्हे नोंद केले आहेत, तर तब्बल 21 लाख 53 हजार 431 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे

शिरपूर पोलिसांनी आवळल्या दारूतस्करांच्या मुसक्‍या, 22 लाखांचा मुद्देमाल जप्त

sakal_logo
By
तुषार अतकारे

वणी (जि. यवतमाळ) : दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेलगत वणी तालुक्‍यातील शिरपूर पोलिस ठाण्याची हद्द आहे. मद्यपींचे चोचले पुरविण्यासाठी दारूतस्कर विविध फंडे अवलंबत दारूची तस्करी करतात. याला आळा घालण्यासाठी शिरपूर पोलिसांनी गस्त वाढविली असून, ठिकठिकाणी नाकेबंदी केल्याने अवघ्या दीड महिन्यात अवैध दारूची वाहतूक व तस्करीबाबत 45 गुन्हे नोंद करीत तब्बल 21 लाख 53 हजार 431 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

हेही वाचा - संदीप जोशींवर गोळीबार ते राजीनामा; मुंढे आले अन् गेले, कोरोनामुळे सुधारली आरोग्य यंत्रणा

चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी करण्यात आल्यानंतर सिमावर्ती भागातील लिकरकिंग पुढे सरसावले होते. बेरोजगार तरुणाची फौज निर्माण करून दारुतस्करीचा गोरख धंदा अवलंबिण्यात आला होता. वाटेल त्या वाहनातून दारूची तस्करी करण्यात येत होती. एसटी महामंडळाच्या बसमधूनसुद्धा प्रवाशांच्या माध्यमातून दारूची तस्करी करण्यात येत होती. कालांतराने दुचाकी व आलिशान चारचाकी वाहनातून होणारी दारूची तस्करी उघड झाल्यानंतर चक्क भाजीपाल्याची वाहने, ट्रक, मालवाहू वाहने त्यातून रात्री अंधाराचा फायदा घेत होणारी दारूची तस्करी पोलिस प्रशासनाकरिता डोकेदुखी वाढविणारी होती. 

हेही वाचा - दीड वर्षाच्या चिमुकलीने बापाचे अंत्यदर्शन घेताच उपस्थितांनी फोडला टाहो, शहीद कैलास दहीकर अनंतात...

लिकरकिंग दारूबंदी असलेल्या चंद्रपुरात दारू पुरविताना दिसत आहेत. काहींनी तर यवतमाळ ते उमरेड व्हाया चंद्रपूर असा अचाट प्रवास कायदेशीर टिपीचा आधार घेत केल्याचा प्रकार चव्हाट्यावर आला होता. तर सीमावर्ती भागातील दारूविक्रेत्यांचा अचानक वाढलेला दारूचा खप आश्‍चर्यचकित करणारा आहे. चंद्रपुरात दारूबंदी झाल्यानंतर संधीचे सोने करण्याचा विडा अनेक दारुमाफियांनी उचलल्याचे सकृतदर्शनी दिसत आहे. 

हेही वाचा - चक्क १५० किलो सोन्या-चांदीच्या कमानीने केले होते आमदाराचे स्वागत, प्रचंड गर्दीत एकही...

शिरपूर पोलिस ठाण्याचे ठाणेदार सचिन लुले यांनी दारूमाफियांच्या मुसक्‍या आवळण्याचे धोरण अवलंबल्याचे दिसत आहे. मागील दीड महिन्यात अवैध दारूची तस्करी व वाहतूक करणाऱ्या 45 जणांवर गुन्हे नोंद केले आहेत, तर तब्बल 21 लाख 53 हजार 431 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गेल्या 26 डिसेंबरला एक चारचाकी वाहन व तीन दुचाकी जप्त करण्यात आली आहे. तीन दारुतस्करांना ताब्यात घेण्यात आले आहे. वणीचे उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुजलवार यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सचिन लुले, पीएसआय ज्ञानेश्वर ढवळे, सुगद दिवेकर, प्रमोद जुनूनकार, संजय खांडेकर, अमोल कोवे, गुणवंत पाटील, अनिल सुरपाम यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. 

हेही वाचा - नुकसानाबाबतचा प्रशासनाचा प्रस्तावच चुकीचा;  फेरआराखडे सादर करण्याच्या केंद्रीय पथकाच्या सूचना 

अगामी ग्रामपंचायतींच्या निवडणुका व 31 डिसेंबर मद्यपींसाठी पर्वणीच असते. सीमावर्ती भागातून चंद्रपुरात व शिरपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ग्रामपंचायतींच्या निवडणुका असलेल्या गावात अवैध दारूचा शिरकाव होऊ नये, याची खबरदारी घेतली जात आहे. सोबतच गस्त व नाकाबंदी वाढविण्यात आली आहे. 
- सचिन लुले, ठाणेदार, शिरपूर. 
 

loading image