esakal | 15 घरफोड्यांतील चार चोरट्यांना अटक; सोन्याचांदीसह साडेतीन लाखांचा माल जप्त
sakal

बोलून बातमी शोधा

गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात सतत घरफोड्यांच्या घटना घडत होत्या. स्थानिक पोलिस ठाण्यांकडून त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी रात्रीची गस्त व इतर उपाययोजना करण्यात आल्या.

गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात सतत घरफोड्यांच्या घटना घडत होत्या. स्थानिक पोलिस ठाण्यांकडून त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी रात्रीची गस्त व इतर उपाययोजना करण्यात आल्या.

15 घरफोड्यांतील चार चोरट्यांना अटक; सोन्याचांदीसह साडेतीन लाखांचा माल जप्त

sakal_logo
By
दीपक फुलबांधे

भंडारा : गेल्या दोन वर्षांत वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत 15 घरफोड्या करून लाखो रुपयांची चोरी करणाऱ्या चार आरोपींना भंडारा पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने गजाआड केले. यात एका विधीसंघर्षरत बालकाचा समावेश आहे. त्यांच्याकडून सोनेचांदीसह तीन लाख 57 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात सतत घरफोड्यांच्या घटना घडत होत्या. स्थानिक पोलिस ठाण्यांकडून त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी रात्रीची गस्त व इतर उपाययोजना करण्यात आल्या. परंतु, गुन्ह्यांना नियंत्रण मिळाले नाही. त्यामुळे जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत जाधव आणि अपर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती यांनी स्थानिक गुन्हे शाखेला गुन्हे उघडकीस करण्याचे आदेश दिले. त्याअनुषंगाने नाकेबंदी,शोध मोहिम, गस्त आणि गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक जयवंत चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी सतत घरफोड्यांच्या गुन्ह्यांवर लक्ष केंद्रित केले होते.

हेही वाचा - "ओ मामी, बजेटवर एक रॅप साॅंग लवकर घेऊन या";...

पोलिस कर्मचाऱ्यांनी गुप्त माहितीच्या आधारे भंडारा शहरातील विधीसंघर्षरत बालकाला विश्‍वासात घेऊन त्याची सखोल विचारपूस केली. त्यातून घरफोडीतील इतर चार आरोपींची माहिती मिळाली. त्यात निहार अण्णाजी राऊत (वय 23), नंदू सहदेव बांगडकर (वय 23) भारत रामदास देशकर (वय 34) आणि वैभव सुनील बनकर (वय 24) यांच्यासोबत मिळून वेगवेगळ्या ठिकाणी घरफोड्या केल्याचे सदर बाल आरोपीने पोलिसांनी सांगितले. त्यावरून चारही आरोपींना ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली. 

त्यातून आठ पोलिस ठाणे क्षेत्रातील 15 घरफोड्यांची माहिती मिळाली. घरातील व्यक्ती बाहेर गेले असताना कुलूप तोडून चोरी करण्याची त्याची पद्धत आहे. त्यांच्याकडून वेगवेगळ्या घटनांतील 134.5 ग्रॅम सोने, 325 ग्रॅम चांदी, एक चांदीची मूर्ती, होमथिएटर, एलईडी असा तीन लाख 57 हजार 400 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

हे गुन्हे उघड करण्यासाठी पोलिस अधीक्षक वसंत जाधव व अपर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक जयवंत चव्हाण, हवालदार नितीन महाजन, धर्मेंद्र बोरकर, सुधीर मडामे, तुळशीदास मोहरकर, वामन ठाकरे, पोलिस नायक नंदू मारबते, क्रिष्णा बोरकर, मंगेश मालोदे, प्रशांत कुरंजेकर, कौशिक गजभिये, सचिन देशमुख यांनी गुन्हे उघड केले.

शहरात चार घरफोड्या

या आरोपींनी भंडारा शहरात चार घरफोड्या केल्या आहेत. तसेच मोहाडी परिसरात दोन, आंधळगाव भागात दोन, कारधा परिसरात दोन ठिकाणी घरफोड्या केल्या. याशिवाय सिहोरा, पालांदूर, लाखनी, मुरमाडी आणि खैरलांजी (तुमसर) येथे प्रत्येकी एक घरफोडी केली आहे.

नक्की वाचा - ग्रामीण भागात देशी कट्टे येतात कुठून? खापरखेडा परिसरात...

घरफोडीचे गुन्हेगार गुन्हे करण्याआधी परिसरात फिरून चौकशी करत असतात. त्याकरिता अशा गुन्हेगारांवर आळा घालण्यासाठी सर्वांनी बाहेरगावी जाताना तसेच संशयित व्यक्ती फिरताना आढळल्यास त्वरित जवळच्या पोलिस ठाण्याला माहिती द्यावी. तसेच जास्तीत जास्त सीसीटीव्ही कॅमेरे लावले पाहिजे.
-वसंत जाधव
पोलिस अधीक्षक, भंडारा.

संपादन - अथर्व महांकाळ