विदर्भात सरासरी ६६ टक्के मतदान, कोण होणार गावाचा कारभारी?

66 percentage voting in grampanchayat election in vidarbha
66 percentage voting in grampanchayat election in vidarbha

नागपूर : विदर्भातील एकूण ११ जिल्ह्यांमध्ये असलेल्या ३६१५ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी काही अपवाद वगळता शांततेत मतदान पार पडले. दुपारी साडेचार वाजेपर्यंत सरासरी ६६.९० टक्के मतदान झाले. यवतमाळ जिल्ह्यातील शेंबाळपिंपरी येथील मतदान केंद्रावर दोन गटात राडा झाला. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. आपले भाग्य आजमावण्यासाठी उमेदवारांना सोमवारी (ता. १८) जाहीर होणाऱ्या निकालाची वाट पहावी लागणार आहे.

विदर्भातील तीन हजार ६१५ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी (ता. १५) मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. एकूण ६४ हजार १९६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे एका ठिकाणी एकाच कुटुंबातील तीन जावा, तर काही ठिकाणी एकाच घरातील दोन ते तीन सदस्य एकमेकांविरुद्ध उभे होते. मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी साडेचार वाजेपर्यंत सरासरी ६६.९० टक्के मतदान झाले. सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० अशी मतदानाची वेळ होती. परंतु, जसजशी मतदान संपण्याची वेळ जवळ येत होती तसतशी मतदारांची मतदान केंद्रांवर गर्दी होत असल्याचे अनेक ठिकाणी बघावयास मिळाले. मतदान केंद्रांवरील मतदारांची गर्दी आणि उत्साह बघता हे मतदान सर्वत्र ८० ते ८५ टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता सर्वच मतदान केंद्रांवर मतदारांसाठी थर्मल स्कॅनिंग मशीन आणि सॅनिटायझरचा वापर करण्यात येत होता. 

शेंबाळपिंपरीत सौम्य लाठीचार्ज -
यवतमाळ जिल्ह्यातील शेंबाळपिंपरी येथे मतदानादरम्यान दोन गटात राडा झाला. जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेतील मतदान केंद्रावर मतदान सुरू असताना मतदानासाठी उभ्या असलेल्या व्यक्तीला धक्का मारल्याच्या कारणांवरून दोन गटात हाणामारी झाली. त्यामुळे जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. 

विदर्भात सायंकाळी साडेचार वाजेपर्यंतचे मतदान - 

  • नागपूर ६२ टक्के 
  • वर्धा ६७.१३ टक्के 
  • चंद्रपूर ६४ टक्के 
  • गडचिरोली ८२.१८ 
  • गोंदिया ७३.१६ टक्के 
  • भंडारा ७० टक्के 
  • अमरावती ६० टक्के 
  • अकोला ५८ टक्के 
  • बुलडाणा ६३.५४ टक्के 
  • वाशीम ६१ टक्के 
  • यवतमाळ ७५ टक्के 
  • एकूण ६६. ९ टक्के मतदान
     

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com