चिंताजनक! कोरोनासोबतच डेंगीचाही वाढला धोका, दोन महिन्यात ७४ रुग्ण

74 dengue patients found in amravati
74 dengue patients found in amravati

अमरावती : महापालिकेच्या क्षेत्रात सप्टेंबर ते नोव्हेंबर अखेरपर्यंत डेंगीचे एकूण 95 संशयित रुग्ण आढळले असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाने म्हटले आहे, तर जिल्हा हिवताप कार्यालयाने दिलेल्या माहितीत 119 रुग्णांची नोंद आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 225 रुग्णांची नोंद झाली आहे. 

साथरोगांच्या पार्श्‍वभूमीवर महापालिका क्षेत्रात डेंगीचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण ग्रामीण भागाच्या तुलनेत अधिक आहे. कोरोना संक्रमणाचा दुसरा टप्पा सुरू असून दररोज बाधित रुग्ण आढळत असताना डेंगीने वर काढलेले डोके चिंतेची बाब आहे. कोरोना संक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर तीन वेळा करण्यात आलेल्या आरोग्य सर्वेक्षणात डेंगीचे रुग्ण आढळल्याची नोंद नाही. इतर आजारांनी ग्रस्त रुग्णांचे आकडे आहेत. त्यामुळे डेंगीसाठी स्वतंत्र सर्वेक्षण करणार का? असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

ऑगस्टनंतर शहरी क्षेत्रात डेंगीने चांगलेच डोके वर काढले आहे. महापालिका क्षेत्रात डेंगी बाधितांची संख्या जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीत 42 इतकी होती. सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत 74 नवे बाधित रुग्ण आढळल्याने ही संख्या 116 वर पोहोचली. महापालिकेच्या आरोग्य विभागाने जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत 95 रुग्णांची नोंद असल्याचे सांगितले, तर जिल्हा हिवताप कार्यालयाने हाच आकडा 116 असल्याचे म्हटले आहे. त्याचवेळी ग्रामीण क्षेत्रात 109 रुग्ण आढळल्याचेही जिल्हा हिवताप कार्यालयाने सांगितले. दोन आरोग्य विभागाच्या माहितीत असलेली तफावत समन्वयाचा अभाव दर्शविणारी असतानाच गंभीर स्वरूपाची बाब आहे.

जिल्ह्यात एकूण 1481 रक्तजल नमुने घेण्यात आले होते. त्यापैकी 225 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. गतवर्षीच्या तुलनेत हे प्रमाण कमी आहे. गतवर्षी महापालिकेच्या क्षेत्रात 737 रक्तजल नमुने घेण्यात आले, त्यात 168 जण बाधित होते.

सेंटीनल सेंटरची मागणी -
रक्तजल नमुने तपासणीसाठी अकोला येथे पाठविले जातात. तेथून आलेला अहवालच विचारात घेतला जातो. मात्र, स्थानिक पातळीवर प्रयोगशाळेत एनएच एक चाचणी पॉझिटिव्ह आल्यास त्या रुग्णावर डेंगीचे उपचार केले जातात. अकोला येथून अहवाल येईस्तोवर रुग्ण दुरुस्त होऊन घरी परतलेला असतो. त्यामुळे कोरोना चाचणीप्रमाणे अमरावती येथेही डेंगीची चाचणी करणारी प्रयोगशाळा सुरू करावी, अशी मागणी केली जात आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com