esakal | कर्तुत्वाला सलाम! ७८ वर्षांचा कोरोनायोद्धा उतरला रस्त्यावर; कधी आणतो मृतदेहांसाठी लाकडे, तर कधी धावतो गौरक्षणार्थ

बोलून बातमी शोधा

atal}

नावाप्रमाणेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वात अटळता दिसून येते. विशेष म्हणजे, कोरोनामुळे सर्वाधिक ज्येष्ठ नागरिक बाधित होताना दिसून येत असले तरी न घाबरता, न डगमगता ॲड. अटल आपल्या सामाजिक कार्यात समरस झालेले आहेत.

कर्तुत्वाला सलाम! ७८ वर्षांचा कोरोनायोद्धा उतरला रस्त्यावर; कधी आणतो मृतदेहांसाठी लाकडे, तर कधी धावतो गौरक्षणार्थ
sakal_logo
By
सुधीर भारती

अमरावती : सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र लॉकडाउन सुरू झाले आहे. ९० टक्के नागरिक घरात बसून आहेत. रस्ते सामसूम असून बाजारपेठांमध्ये शुकशुकाट आहे. मात्र, अशाही भीतीदायक परिस्थितीत अमरावतीचा एक ७८ वर्षीय कोरोनायोद्धा आपल्या जिवाची पर्वा न करता सामाजिक बांधीलकेची ढाल घेऊन रस्त्यावर उतरला आहे. ती व्यक्ती म्हणजे ॲड. आर. बी. अटल.

नावाप्रमाणेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वात अटळता दिसून येते. विशेष म्हणजे, कोरोनामुळे सर्वाधिक ज्येष्ठ नागरिक बाधित होताना दिसून येत असले तरी न घाबरता, न डगमगता ॲड. अटल आपल्या सामाजिक कार्यात समरस झालेले आहेत. हिंदू स्मशान संस्था, गौरक्षण संस्था, महेश भवन सारख्या सामाजिक संस्थांचे एकहाती संचालन करणारे ७८ वर्षीय ॲड. अटल यांचे सेवाभावी कार्य आजही जोमाने सुरू आहे. 

हेही वाचा - कोरोना काळातही बेजबाबदारीचा कळस, आरोग्य केंद्रात डॉक्टर अन् कर्मचाऱ्यांचीच दांडी

हिंदू स्मशानभूमीत सध्या कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्या अनेक मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचे फार मोठे आव्हान उभे ठाकले आहे. कारण काही महिन्यांपासून येथील गॅसदाहिनी नादुरुस्त झाली आहे. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी लाकडांची कमतरता निर्माण झाली आहे. अशा स्थितीत सॉ मिल मालक तसेच आजूबाजूच्या खेड्यांतील शेतकऱ्यांशी संपर्क साधून ॲड. अटल लाकडांची व्यवस्था करीत आहेत.

नियमांचा भंग करून एका छोटाशा वाहनात दाटीवाटीने कोंबलेल्या अनेक गायी गौरक्षणमध्ये दाखल होताहेत. अनेकांना जखमा झाल्या असून त्यांना औषधोपचार तसेच चारापाण्याची व्यवस्था गौरक्षण संस्थेकडून केली जात आहे. त्यासाठीसुद्धा ॲड. अटल दररोज सकाळी काही तास गौरक्षणात येतात. 

शहरातील शासकीय कोविड रुग्णालयामध्ये बेड्‌स हाउसफुल्ल होण्याच्या स्थितीत असून अमरावतीकरांची गैरसोय होऊ नये यासाठी ॲड. अटल यांनी पुढाकार घेत महेश भवन येथील विस्तीर्ण परिसरात डॉक्‍टरांच्या सहकार्याने कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. या केंद्रामध्ये १०५ बेड्‌सची व्यवस्था करण्यात आलेली आहे.एकूणच सर्वकाही लॉकडाउन असताना एखादी वयोवृद्ध व्यक्‍ती आपल्या आरोग्याची पर्वा न करता समाजासाठी भरीव योगदान देतो. अशा व्यक्ती समाजात फारच कमी आढळून येतात.

हेही वाचा - धास्ती 'बर्ड फ्लू'ची! ३३ हजार ५०० कोंबड्या नष्ट, पोल्ट्री धारकांना मिळणार भरपाई

आपण केवळ आपले काम करीत आहे. कुठल्याही फळाची अथवा प्रसिद्धीची अपेक्षा कधीही ठेवली नाही. यापुढेसुद्धा निरंतर कार्य सुरू ठेवण्याचा प्रयत्न राहील.
- ॲड. आर. बी. अटल
समाजसेवक. 

संपादन - अथर्व महांकाळ