esakal | अमरावती ब्रेकिंग : कोरोनामुळे दोघांचा मृत्यू अन्‌ अंत्यसंस्काराला जमली नागरिकांची गर्दी
sakal

बोलून बातमी शोधा

After the death of  one was reported to be corona positive

शनिवारी रात्री या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याची माहिती तालुका प्रशासनाला मिळाली. तसेच थुगाव (पिंपरी) गावाला कंटनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहे. तसेच गावातील परिसर फवारणी करून निर्जंकीकरण करण्यात आले आहे.

अमरावती ब्रेकिंग : कोरोनामुळे दोघांचा मृत्यू अन्‌ अंत्यसंस्काराला जमली नागरिकांची गर्दी

sakal_logo
By
शरद केदार

चांदूर बाजार (जि. अमरावती) : तालुक्‍यातील थुगाव येथील 50 वर्षीय व्यक्तीचा अमरावती येथील रुग्णालयात मृत्यू झाला. मृत्यूनंतर या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. या व्यक्तीच्या संपर्कातील बारा हायरिस्क व्यक्तींना अमरावती येथील कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. ग्रामीण भागात कोरोनाने पुन्हा एकदा एन्ट्री केली आहे. तसेच दर्यापूर तालुक्‍यातील टाकळी येथील सत्तर वर्षीय महिलेच्या अंत्यसंस्काराला जवळपास 50 ते 60 लोक सहभागी झाले होते. यामुळे प्रशासनाची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे. 

तालुक्‍यातील थुगाव पिंपरी येथील 50 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. त्याची कोरोना चाचणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आला. सदर व्यक्तीचा ट्रोथ स्क्रॅब (ता. 10) जुलै रोजी अमरावती येथील रुग्णालयात घेण्यात आला होता. मात्र, सदर व्यक्ती उपचारादरम्यान मरण पावला. त्यामुळे सदर व्यक्तीचा मृतदेह परिजनांना स्वाधीन करण्यात आला. या इसमासा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचा संशय डॉक्‍टरांनी व्यक्त केला होता.

अधिक माहितीसाठी - महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये रविवारपर्यंत अतिवृष्टीचा इशारा

या व्यक्‍तीवर थुगाव येथे अंत्यसंस्कार पार पडले. अंत्ययात्रेत मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित असल्याची चर्चा तालुक्‍यात जोरात सुरू आहे. या व्यक्तीच्या संपर्कातील 12 हायरिस्क व्यक्‍तींना अमरावती येथील कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी ज्योतसना भगत यांनी दिली. 

शनिवारी रात्री या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याची माहिती तालुका प्रशासनाला मिळाली. तसेच थुगाव (पिंपरी) गावाला कंटनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहे. तसेच गावातील परिसर फवारणी करून निर्जंकीकरण करण्यात आले आहे. अहवाल प्राप्त होताच तहसीलदार अभिजित जगताप, गटविकास अधिकारी डॉ. प्रफुल्ल भोरगडेसह आरोग्य यंत्रणा थुगाव पिपरी येथे दाखल झाली होती.

क्लिक करा - आजवर जिने राखी बांधली तीच उठली जीवावर, अन्‌ घडली ही भयंकर घटना...

महिलेच्या अंत्यसंस्कारालाही जमले नागरिक

दर्यापूर तालुक्‍यातील टाकळी येथील सत्तर वर्षीय महिलेला अस्वस्थ वाटू लागल्यामुळे अकोला येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. खबरदारीचा उपाय म्हणून डॉक्‍टरांनी त्यांची कोरोना चाचणी केली. चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्यावर कोरोना वॉर्डात उपचार सुरू होता. उपचारादरम्यान त्यांना श्‍वसनाचा त्रास झाल्याने मृत्यू झाला. मात्र, अकोला प्रशासनाने तातडीने याबाबत दर्यापूर प्रशासनाला माहिती नाही. यामुळे अंत्यसंस्काराला नागरिकांची गर्दी झाली. आता अंत्यसंस्कारात उपस्थित लोकांचा शोध घेण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. 

अद्याप 32 जणांचा मृत्यू

अमरावती जिल्ह्यात कोरोनाबधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. रविवारी सकाळी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात 24 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 879 झाली आहे. शनिवारी एकाच दिवशी 60 कोरोनाबाधित आढळून आले होते. तसेच मृत्यूचा आकडा 32 झाला आहे.

जाणून घ्या - बिअर बार चालकांसाठी आनंदाची बातमी! सरकारच्या नव्या सूचना जाहीर, वाचा...

... तर गुन्हे दाखल करू
कोरोनाबाधित व्यक्तीच्या कुटुंबातील व्यक्ती माहिती लपवत असल्याचा संशय आहे. मात्र, माहिती देण्यास टाळाटाळ केल्यास गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. 
- अभिजित जगताप, तहसीलदार

संपादन - नीलेश डाखोरे