Bharat Band Updates : यवतमाळात कृषी कायद्याविरोधात निदर्शने, पंतप्रधान मोदींविरोधी घोषणाबाजी

सूरज पाटील
Tuesday, 8 December 2020

शेतकऱ्यांनी ही लढाई आरपारची केली असून तिन्ही कृषी कायदे रद्द केल्याशिवाय मागे हटणार नाही, अशी भूमिका दिल्लीतील शेतकऱ्यांनी घेतलेली आहे. याला यवतमाळ जिल्ह्यात चांगला प्रीतिसाद मिळाला. 

यवतमाळ : दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी कृषी कायद्याविरोधातील आंदोलनाचे पडसाद यवतमाळमध्ये पाहायला मिळत आहे. आज शेतकऱ्यांकडून भारत बंदची हाक देण्यात आली. यावेळी बसस्थानक चौकात विविध संघटनांनी निदर्शने केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 

हेही वाचा - Bharat Band Updates : अमरावतीत संमिश्र प्रतिसाद, काही ठिकाणी आंदोलकांची धरपकड

शेतकऱ्यांनी ही लढाई आरपारची केली असून तिन्ही कृषी कायदे रद्द केल्याशिवाय मागे हटणार नाही, अशी भूमिका दिल्लीतील शेतकऱ्यांनी घेतलेली आहे. याला यवतमाळ जिल्ह्यात चांगला प्रीतिसाद मिळाला. 

हेही वाचा - कृषी विधेयकाविरोधात संघटना एकवटल्या; मंगळवारी बंदची हाक 

कायदा रद्द होईस्तोवर आंदोलन सुरू ठेवणार -
दहा दिवसांपासून लाखोंच्या संख्येने पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशसह देशातील अनेक राज्यांमधील शेतकऱ्यांनी राजधानी दिल्लीच्या सीमांवर आंदोलन छेडले आहे. केंद्र सरकारचे तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या रास्त असून त्यांना न्याय मिळेपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत असल्याची भूमिका यवतमाळ जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्ष, संघटना, व सामाजिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घेतली.  यवतमाळ जिल्ह्यातील 16 तालुक्यात हे आंदोलन सुरू असून कुठे चांगला तर कुठे संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: agitation against agriculture act support to bharat band in yavatmal