

Akola Shiv Sena leader Sagar Bharuka being taken into police custody following a heated clash with BJP leader Vijay Agrawal inside the municipal corporation premises.
esakal
विदर्भाच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. अकोला महापालिकेतील शिंदेंच्या शिवसेनेचे गटनेते सागर भारुका यांना पोलिसांनी अटक केली. भाजपाचे स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांच्या तक्रारीवरून ही अटक करण्यात आली. कारवाईमुळे शिंदेसेना आक्रमक झाली झाली असून अकोल्यातील भाजप आणि शिवसेनेतील अंतर्गत वाद चांगलाच चव्हाट्यावर आल्याचे दिसत आहे. थोड्याच वेळात भारुका यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.