esakal | अन्... भावालाच ठोठावला पोलिस पाटलाने दंड !
sakal

बोलून बातमी शोधा

against the shopkeeper.jpg

शेजारचे तिन्ही जिल्हे ग्रीन, ऑरेंज झाले. अकोला मात्र रेड झाला आणि कोरोना विषाणूविरोधी लढा तीव्र झाला. परिणामी पोलिस पाटलाने आपल्या भावाविरुद्ध दंडाचे अस्त्र उगारत कर्तव्यपरायणतेचा सोमवारी प्रत्यय दिला.

अन्... भावालाच ठोठावला पोलिस पाटलाने दंड !

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मूर्तिजापूर (जि. अकोला) : शेजारचे तिन्ही जिल्हे ग्रीन, ऑरेंज झाले. अकोला मात्र रेड झाला आणि कोरोना विषाणूविरोधी लढा तीव्र झाला. परिणामी पोलिस पाटलाने आपल्या भावाविरुद्ध दंडाचे अस्त्र उगारत कर्तव्यपरायणतेचा सोमवारी प्रत्यय दिला.

हेही वाचा- वृद्ध दाम्पत्याच्या इच्छा शक्तीला सलाम

‘कुणी आपला ना कुणी परका’
तशी अकोला जिल्ह्यात व मूर्तिजापूर तालुक्यातही रणनिती आखल्या गेली आहे. एसडीओ अभयसिंह मोहिते यांनी नगरसेवक, शिक्षकांसह सर्वांनाच या मोहिमेवर तैनात केले आहे. शहरात आहे तसा लवाजमा ग्रामीण भागातही आहे. ग्रामस्तरीय कोरोना समिती गावागावात लॉकडाउन, सोशल डिस्टन्सिंगवर लक्ष ठेवून असतात. नियमभंग करणाऱ्यांवर लगेच कारवाईचा बडगा उगारला जातो. या लढ्यात ‘कुणी आपला ना कुणी परका’, हा नियम किती आवश्यक आहे याचे महत्त्व सोमवारी पटले. गोरेगाव या परमहंस पुंडलिक बाबांच्या जन्मगावात.

क्लिक करा- अकोला ब्रेकिंग : गाव-खेड्यातही पोहचला कोरोना

दंड ठोठावून वसूल देखील केला
गावातील ग्रामस्तरीय कोरोना समिती नित्यनेमाप्रमाणे आपल्या टेहेळणी कर्तव्यावर निघाली. दिलेला वेळ संपूनही उघड्या असलेल्या दुकानाकडे समितीचा मोर्चा वळला. अध्यक्षा ताई सरदार, सदस्य तलाठी संदीप बोळे, कृषी सहाय्यक शुभांगी कथलकर आणि पोलिस पाटील राजिव सोनोने यांची समिती अर्जुन सोनोने, गोपाळ कळंब यांच्या दुकानावर पोचली. त्यापैकी एक दुकानदार अर्जुन सोनोने हे समिती सदस्य राजिव सोनोने यांचे बंधू होते. मात्र, कुठलाही दुजाभाव न ठेवता समितीने दोन्ही दुकानदारांना प्रत्येकी दोन हजार रुपये दंड ठोठावला व वसूलही केला.

loading image