अमरावती : चांदूरबाजार येथे युवकाची हत्या; तीन संशयितांना अटक

जिल्हा पोलिस अधीक्षक चांदूरबाजारात तळ ठोकून
Amravati Murder Crime
Amravati Murder Crimesakal

अमरावती : चांदूरबाजार-मोर्शी रोडवरील सचिन रेस्टॉरंटच्या मागील खुल्या जागेत सोमवारी रात्री (ता.१७) साडेदहाच्या सुमारास शेख जावेद शेख हसन ऊर्फ जवा (वय २२) या युवकाची धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना घडली.

चांदूरबाजार शहरातील नयना बारपासून सुरू झालेला वाद मोर्शी रोडवरील सचिन रेस्टॉरंटच्या मागील खुल्या जागेतसुद्धा काही मित्रांसोबत सुरू होता. अखेर त्याचे रूपांतर भांडणात होऊन घनश्याम ईश्वर दिठोर ऊर्फ बिटवा (वय २५) या युवकाने शेख जावेद शेख हसन ऊर्फ जवा व शहजाद वल्द रऊफ (वय २५) यांना धारदार शस्त्राने वार करून जखमी केले.(Amravati Murder Crime)

Amravati Murder Crime
FIFA प्लेअर ऑफ द इयर अलेक्सिया पुटेलास आहे तरी कोण?

शेख जावेदला ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले. तेथून अमरावतीला रेफर करण्यात आले. त्यादरम्यान शेख जावेदचा मृत्यू झाला. याप्रकरणाची तक्रार शहजाद वल्द रऊफ (वय २४) याने चांदूरबाजार पोलिस ठाण्यात केली. त्यावरून पोलिसांनी संशयित आरोपी घनश्याम डिठोर, करण खोडे (वय २८), श्रीकेश ढोमणे यांना अटक केली. सदर गुन्ह्यात आणखी आरोपी अटक होण्याची शक्यता आहे. पुढील तपास प्रभारी ठाणेदार सुरेंद्र अहिरकर करीत आहेत.

Amravati Murder Crime
महाराष्ट्र उपाशी तर शेजारील राज्य तुपाशी!

जिल्हा पोलिस अधीक्षक चांदूरबाजारात तळ ठोकून

घटनेचे गांभीर्य पाहता जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ सकाळी चार वाजेपासूनच चांदूरबाजार पोलिस ठाण्यात उपस्थित आहेत. तसेच अपर पोलिस अधीक्षक शशिकांत सातव, उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश पांडे, शिरजगाव कसबाचे ठाणेदार दीपक वळवी, ब्राह्मणवाडा थडीचे ठाणेदार पंकज दाभाडे तसेच आसेगाव, शिरखेड, खल्लार, तळेगाव दशासर, खोलापूर, माउली आदी ठाण्यांच्या अधिकाऱ्यांसह स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व पोलिस तैनात आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com