महाराष्ट्र उपाशी तर शेजारील राज्य तुपाशी!

राज्य शासनाने पुन्हा कोरोना वाढल्याच्या नावाखाली पर्यटन व्यवसायावर बंदी
State Government Corona Again Tourism On Business Captive
State Government Corona Again Tourism On Business Captive sakal

नागपूर : कोरोना (Corona) महामारीच्या संकटामुळे २०२० पासून राज्यातील रिसॉर्ट, निसर्ग पर्यटन व्यवसाय ठप्प झाले आहेत. तिसऱ्या लाटेच्या (third wave covid-19) पार्श्वभूमीवर राज्य शासनाने पुन्हा कोरोना वाढल्याच्या नावाखाली पर्यटन व्यवसायावर बंदीचा बडगा उगारला आहे. राज्यातील पर्यटन स्थळे बंद केलीत. यामुळे कर्जाचा डोंगर डोक्यावर घेऊन जगण्याचा प्रयत्न करणाऱ्या छोट्या मोठ्या हॉटेल, जिप्सी, ट्रॅव्हल एजंट आणि रिसॉर्टचे संचालक व त्यांचे कर्मचाऱ्यांवर संकट ओढवले आहे. महाराष्ट्रात पर्यटन (Maharashtra Tourism) बंद असले तरी मध्यप्रदेशासह इतर राज्यात पर्यटन सुरु असल्याने पर्यटकांचा ओढा त्या राज्यांकडे वळू लागला आहे.

State Government Corona Again Tourism On Business Captive
IPLने नाकारलेला उन्मुक्त चंद BBL खेळणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू

राज्यातील सर्वच जंगल सफारी बंद केली आहे. त्यामुळे विदर्भातील सर्वाधिक रोजगार देणाऱ्या या व्यवसायाला पुन्हा काळे मळभ दिसू लागले आहेत. मात्र महाराष्ट्रालगत असलेल्या शेजारील राज्यात सफारी सुरू आहे. त्यामुळे सध्याच्या जंगल सफारीचा महत्त्वाच्या सिझनमध्ये महाराष्ट्रातील केंद्रे उपाशी व अन्य राज्यातील सफारी केंद्रे पूर्ण गर्दीने तुपाशी अशी परिस्थिती आहे. सध्या ओमिक्रॉनचे रुग्ण वाढत असताना पर्यटन स्थळे मर्यादित व सुरक्षित वेळेत सुरू ठेवली असती तरी त्याचा मोठ्या प्रमाणात स्थानिकांना फायदा झाला आहे. मात्र या निर्बंधांमुळे राज्यात येणारा पर्यटक वर्ग, देशातील अन्य राज्यांकडे वळला आहे.

State Government Corona Again Tourism On Business Captive
नाना पटोले तोंडघशी! 'तो' दावा भंडारा पोलिसांनी काढला खोडून

निसर्ग पर्यटन व्यवसायावर विदर्भातील पाच व्याघ्र प्रकल्प आणि २४ अभयारण्यात अंदाजे दीड लाखाच्या जवळपास लोकांना विविध मार्गातून रोजगार मिळत असतो. त्यातून त्यांचा उदरनिर्वाह चालू असतो. गेल्या दोन वर्षापासून या व्यवसायावर अनिश्चिततेचे सावट पसरले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असून अनेकांनी नवा रोजगाराचा पर्याय निवडला असल्याची माहिती आहे.

State Government Corona Again Tourism On Business Captive
देशमुखांचा तुरुंगातील मुक्काम वाढणार; PMLA कोर्टानं नाकारला जामीन

याबाबत बोलताना सोसायटी फॉर वाइल्ड लाइफ कॉन्झरर्व्हेशन ॲण्ड डेव्हलपमेंट अमरावतीचे अध्यक्ष प्रवीण चावजी म्हणाले, राज्यातील निसर्ग पर्यटन सुरु झाले पाहिजे. यावर मोठ्या प्रमाणात रोजगार मिळत असतो. इतर राज्यात पर्यटन सुरु असताना राज्यातच पर्यटन बंद का असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. निसर्ग पर्यटनाला परिवारासह नागरिक येत असता. त्यामुळे प्रादुर्भाव होण्याची शक्यताच कमी असते. राज्यातील सफारी बंद असल्याने अनेक लोक शेजारच्या राज्यातील जंगलामध्ये पर्यटनासाठी जात आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com