esakal | अनावश्यक फिरणाऱ्यांची अँटीजेन तपासणी, दोन दुकानांवरही कारवाई

बोलून बातमी शोधा

Corona Test
अनावश्यक फिरणाऱ्यांची अँटीजेन तपासणी, दोन दुकानांवरही कारवाई
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : कोरोना वाढत्या प्रादुर्भावामुळे एक मेपर्यंत कठोर निर्बंध लागू केले आहे. अत्यावश्‍यक सेवाही सकाळी अकरापर्यंतच सुरू आहे. केवळ मेडिकल तसेच रुग्णालय सुरू ठेवण्याचे आदेश आहे. असे असतानाही नियम मोडून काही दुकाने सुरू होती. अशांवर तहसील पथकाने शुक्रवारी (ता.23) कारवाई करीत दोन दुकानांना कुलूप लावले.

हेही वाचा: पोलिस शिपायांची आंतरजिल्हा बदली रद्द

जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. मृत्यूदरही वाढला आहे. ही साखळी तोडण्यासाठी शासनाने संचारबंदी लागू केली आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये, म्हणून अत्यावश्‍यक सेवा सुरू ठेवल्या आहेत. नागरिकांकडून नियमांकडे दुर्लक्ष होत आहे. बाजारात मोठ्याप्रमाणात गर्दी होत आहे. त्याचाच फायदा घेत अत्यावश्‍यक सेवेत नसलेली दुकाने सुरू आहे. अशा दुकानांवर शुक्रवारी (ता. 23) तहसील तसेच पालिका पथकाने कारवाई केली. मुख्य बाजारपेठेतील दोन दुकानांवर कारवाई करण्यात आलेली आहे. तहसीलदार कुणाल झाल्टे, डॉ. विजय अग्रवाल, नितीन घुले, शंकर भोळे, देवानंद ठवकर आदी उपस्थित होते. सकाळी 11 नंतर बाजारपेठ बंद झाल्यानंतरही अनेक जण विनाकारण फिरत आहे. त्यामुळेच आर्णी नाका परिसरात मेडिकलची एक टिम तैनात करण्यात आली होती. याठिकाणी विनाकारण फिरणाऱ्यांची तपासणी करण्यात आली. यावेळी उपविभागीय अधिकारी अनिरुद्ध बक्षी, तहसीलदार कुणाल झाल्टे यांच्यासह आरोग्य विभाग, पोलिसांची चमू उपस्थित होती.