पालकांचे संमतीपत्रक असेल तरच आश्रमशाळेत प्रवेश, १ डिसेंबरपासून होणार सुरू

ashramshala will starts from 1 december in amravati
ashramshala will starts from 1 december in amravati

अमरावती : राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने इयत्ता नववी ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यासंदर्भात 23 नोव्हेंबरची तारीख निश्‍चित केली. परंतु, आदिवासी विकास भागाच्या निवासी आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळांसह एकलव्य निवासी शाळांसाठी 1 डिसेंबर 2020 ही डेडलाईन निश्‍चित केली आहे. 

विद्यार्थ्यांसह शिक्षकांच्या आरोग्याची खबरदारी घेणे बंधनकारक केले. शहर व तालुक्‍याच्या स्तरावर असणारे वसतिगृह सुद्धा सुरू होतील. दुर्गम व शहरी भागात असलेल्या आश्रमशाळा कोविड-19 च्या काळात बंद आहेत. यापूर्वी अपर आयुक्त अमरावती व नागपूर विभागातील आश्रमशाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 26 जूनपासून शाळेत उपस्थित राहण्यास सांगितले होते. परंतु, वाढत्या प्रादुर्भावामुळे ही बाब शक्‍य झाली नाही. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी पुस्तके त्यांच्यापर्यंत पोहोचली. गावे शिक्षकांना दत्तक देऊन अनलॉक लर्निंगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न सुरू केले. 

आश्रमशाळा वसतिगृहे 1 डिसेंबरला सुरू करण्याच्या निर्णयामुळे आदिवासी आश्रमशाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना त्यांची कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली. त्यांनी शाळेत प्रवेश करताना गृहपाल, मुख्याध्यापकास तसे प्रमाणपत्र सादर करावे लागेल. शारीरिक अंतराचे पालन करण्यासोबतच,  वर्गखोल्यांचे निर्जंतुकीकरण, यासह इतरही बाबींकडे लक्ष देण्याचे बंधन घालण्यात आले. विद्यार्थ्यांच्या पालकांकडून शाळा, वसतिगृहात पाठविण्यापूर्वी संमतीपत्र भरून घेतले जाईल. अमरावती अपर आयुक्तांच्या अंतर्गत जवळपास 81 शासकीय आश्रमशाळा आणि सव्वाशेच्या आसपास अनुदानित आश्रमशाळा आहेत. 

वसतिगृह निवासाचा प्रश्‍न गंभीर -
शहरात उच्चशिक्षणासाठी असलेले जे आदिवासी विद्यार्थी वसतिगृहात राहतात त्यापैकी बहुतांश वसतिगृहे ही भाड्याच्या इमारतीत आहेत. तेथे दाटीने विद्यार्थी राहतात. आता कोरोना प्रादुर्भावानंतर ही अडचण दूर करताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. 

पन्नास टक्के उपस्थितीतील तरतूद -

आश्रमशाळेतील गर्दी टाळण्यासाठी विद्यार्थ्यांना एक दिवसाआड बोलविले जाईल. एकाच दिवशी 50 टक्के विद्यार्थी अनलॉक लर्निंगमध्ये तर, उर्वरित 50 टक्के विद्यार्थी प्रत्यक्ष वर्गात उपस्थित राहून शिक्षण घेतील.

विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्‍न गंभीर होऊ नये म्हणून आवश्‍यक ती काळजी घेतली जाईल. शासनाच्या निर्देशांचे पालन करण्यास प्राथमिकता राहील.
-विनोद पाटील, अपर आयुक्त, आदिवासी विकास विभाग, अमरावती. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com