Video : जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांना मिळाली अनोखी भेट, वाचा सविस्तर... 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

एकलव्यच्या आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, विद्यापीठ, खेलो इंडिया खेळाडूंचा प्रहार संघटनेच्या वतीने भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. एकलव्य अकादमीला व खेळाडूंना मदत करण्याचे व नांदगावला विकासात्मक दर्जा प्राप्त होण्यासाठी मान्यवरांनी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्‍वासन दिले.

परतवाडा (जि. अमरावती) :  अचलपूर मतदारसंघाचे आमदार, शेतकरी नेते आणि आपल्या आंदोलनाने नेहमीच चर्चेत असलेले आक्रमक आमदार म्हणून जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांचे नाव घेतले जाते. कामचुकार अधिकाऱ्यांना निलंबित करणे, अधिकाऱ्यांशी बाचाबाची किंवा हुशार आणि प्रामाणिक अधिकाऱ्यांचा सत्कार अशा विविध कारणांनी बच्चू कडू नेहमी चर्चेत असतात. आता बच्चू कडू वेगळ्याच कारणानी चर्चेत आहेत. जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांना जाधव कुटुंबीयांकडून पांढर शुभ्र घोडा भेट म्हणून देण्यात आला. या अनोख्या भेटीची चर्चा जिल्हाभर रंगली आहे. 

युवा विकास केंद्राद्वारा संचालित एकलव्य धनुर्विद्या क्रीडा अकादमीत क्रीडा सुविधा निर्मितीअंतर्गत बंदिस्त प्रेक्षागृहाचा (क्रीडाहॉल) उद्‌घाटन सोहळा रविवारी (ता. नऊ) जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते, तर आमदार अरुण अडसड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.

अधिक वाचा - अंकिताला जिवानिशी ठार करणे हाच होता विकेशचा उद्देश

र्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खासदार रामदास तडस, आमदार प्रताप अडसड, नगराध्यक्ष संजय पोफळे, गणेश चैतन्य महाराज, दिनेश सूर्यवंशी, जिल्हा क्रीडाधिकारी गणेश जाधव, भारतीय धनुर्विद्या संघटनेचे सचिव प्रमोद चांदूरकर उपस्थित होते. याप्रसंगी पुरस्कारप्राप्त व कर्तव्यदक्ष व्यक्ती भारतीय धनुर्विद्या संघटना सचिव प्रमोद चांदूरकर, श्रीराम जऊळकर, वर्षा भाकरे, नीलेश विश्‍वकर्मा, डॉ. प्रवीणा देशमुख, रामहरी राऊत यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

तत्पूर्वी, राज्यमंत्री बच्चू कडू, आमदार अरुण अडसड व मान्यवरांसह ढोलताशांच्या गजरात बसस्थानक ते एकलव्य गुरुकुल स्कूलपर्यंत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी राज्यमंत्री बच्चू कडू यांना जाधव कुटुंबीयांकडून घोडा भेट देण्यात आला. यावेळी एकलव्य अकादमी व एकलव्य गुरुकुल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी लेझीम, योगा, सायकल मल्लखांबचे प्रात्यक्षिक दाखविले. 

असे का घडले? - कोणी सांगेल का? माझी काय चूक होती...

एकलव्यच्या आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, विद्यापीठ, खेलो इंडिया खेळाडूंचा प्रहार संघटनेच्या वतीने भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. एकलव्य अकादमीला व खेळाडूंना मदत करण्याचे व नांदगावला विकासात्मक दर्जा प्राप्त होण्यासाठी मान्यवरांनी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्‍वासन दिले. आयोजनासाठी युवा विकास केंद्र संचालित एकलव्य धनुर्विद्या अकादमी व एकलव्य गुरुकुल स्कूलच्या पदाधिकारी, शिक्षकवृंद, राष्ट्रीय खेळाडू, पालकवर्ग व गावकऱ्यांनी सहकार्य केले. 

घोडा देऊन केली परतफेड

जिल्हा आणि सर्व तालुकास्थरीय अधिकाऱ्यांना शासकीय वाहन शासनातर्फे दिले गेले आहे. मात्र, अमरावती जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याला शासकीय वाहन नव्हते. आमदार बच्चू कडू यांनी आपल्या निधीतून अमरावती जिल्हा क्रीडा अधिकारी जाधव यांना चारचाकी गाडी भेट दिली होती. त्याची परतफेड म्हणून जाधव कुटुंबीयांनी पांढरा शुभ्र घोडा भेट दिला. यानंतर बच्चू कडू यांनी घोड्यावर बसून रपेट मारली. या अनोख्या भेटीने बच्चू कडू चक्रावून गेले होते. 

घोड्याबद्दल आकर्षण व प्रेम असल्यामुळे दिला भेट 
बच्चू कडू शाळेमध्ये घोड्यावर जात असत अशी माहिती मला मिळाली. त्यांना घोड्याबद्दल आकर्षण व प्रेम आहे. त्यामुळे माझ्या आश्रमातील शौर्याचे प्रतीक असलेला घोडा त्यांच्या भेट दिला. 
- सदानंद जाधव, 
मार्गदर्शक, एकलव्य अकॅडमी, नांदगाव खंडेश्‍वर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bacchu kadu received a horse gift