बुलडाणा: पोलिसाचा मृतदेह आढळला कुजलेल्या अवस्थेत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 मे 2017

बोराखेडी पोलीस ठाण्याचे प्रभारी ठाणेदार सुनील हूडसह पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल असून, पुढील कार्यवाही सुरु आहे.

मोताळा (जि.बुलडाणा) - शहरालगतच्या बोराखेडी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस कर्मचारी रमेश मिसाळकर यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरात कुजलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज (बुधवार) सकाळी बोराखेडी (ता. मोताळा) येथे त्यांच्या राहत्या घरात त्यांचा मृतदेह आढळून आला. मृत्यूचे कारण सध्या अस्पष्ट असून, हृदयविकाराने मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बोराखेडी पोलीस ठाण्याचे प्रभारी ठाणेदार सुनील हूडसह पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल असून, पुढील कार्यवाही सुरु आहे. मिसाळकर यांच्या घरातून वास येत असल्याने चौकशी केली असता त्यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला.

ई सकाळवरील आणखी ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :
काबूलमध्ये भारतीय दुतावासाजवळ स्फोट
मॉन्सून 8 जूनला मुंबईत: हवामान विभाग​
लोकांनी काय खावे हे सरकार ठरवत नाही: केंद्रीय मंत्री
बीफ फेस्टिव्हलवरून विद्यार्थ्याला मारहाण​
मुख्यमंत्र्यांचा शेट्टी, जयंतरावांवर नेम; सदाभाऊंची ढाल​
दिल्ली आयआयटीतील विद्यार्थीनीची आत्महत्या

जनावरे विक्री बंदीबाबत दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना सूट शक्‍य
शेतकरी संपावर काहीही साध्य होणार नाही : माधव भंडारी
#स्पर्धापरीक्षा - बलुचिस्तान

Web Title: Buldana news body of the policeman found