बुलडाणा: जिल्हा परिषदेची शाळा भरते गुरांच्या दवाखान्यात

विरेंद्रसिंग राजपूत
मंगळवार, 18 जुलै 2017

गेल्या 2 वर्षांपूर्वी या परिसरात वादळाने थैमान घातले असता या नादुरुस्त शाळेवरील पत्रे लोखंडी अँगलसह उडून गेली होती. सुदैवाने त्यावेळेस जीवितहानी टळली होती. तेव्हापासून ही शाळा आहे त्या अवस्थेत असल्याने या शाळेतील विद्यार्थ्यांना बसायला जागा उपलब्ध नसल्याने आजरोजी या विद्यार्थाना चक्क शेजारीच असलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्याच्या इमारतीचा आधार घ्यावा लागत आहे.

बुलडाणा : जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील शेम्बा बु. येथे जिल्हा परिषदेची पहिली ते चौथीपर्यंतची गुरांच्या दवाखान्यात भरते. 

गेल्या 2 वर्षांपूर्वी या परिसरात वादळाने थैमान घातले असता या नादुरुस्त शाळेवरील पत्रे लोखंडी अँगलसह उडून गेली होती. सुदैवाने त्यावेळेस जीवितहानी टळली होती. तेव्हापासून ही शाळा आहे त्या अवस्थेत असल्याने या शाळेतील विद्यार्थ्यांना बसायला जागा उपलब्ध नसल्याने आजरोजी या विद्यार्थाना चक्क शेजारीच असलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्याच्या इमारतीचा आधार घ्यावा लागत आहे.

या दवाखान्यात गुराढोरांची नेहमी वर्दळ राहत असल्याने दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्याला धोका पोहचण्याची पण शक्यता आहे. यासाठी प्रशासनाने वेळीच दखल घेऊन येथे नवीन इमारत बांधण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी पालकवर्गातून होत आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :

Web Title: Buldana news zp school issue