फुंडकरांच्या वाढदिवसाचा खर्च टाळून मुख्यमंत्र्यांना 13 लाख 17 हजार सुपूर्द

श्रीधर ढगे
बुधवार, 13 सप्टेंबर 2017

मुंबई येथे एका बैठकीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फुंडकर यांनी 13 लाख 17 हजार एवढया रकमेचे धनादेश सुपुर्द केले.

खामगांव- राज्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता कृषी व फलोत्पादन मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी त्यांच्या वाढदिवसाला फलेक्स बोर्ड, जाहीरात, हार, बुके इत्यादीवर खर्च न करण्याचे आवाहन केले होते व ती रक्कम मुख्यमंत्री शेतकरी सहायता ‍ निधीमध्ये जमा करण्याचे आवाहन केले होते. आज मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 13 लाख 17 हजार एवढया रकमेचे चेक भाऊसाहेब फुंडकर यांनी सुपूर्द केले.

शेतक-यांच्या प्रश्नाविषयी जाण असलेले, शेतकरी नेते ना.भाऊसाहेब फुंडकर यांनी आपल्या संपुर्ण जिवनात एका तपस्वीप्रमाणे जीवन जगले आहे.  याआधी देखील त्यांनी अनेक वेळा आपल्या वाढदिवसानिमीत्य कोणत्याही प्रकारे हार तुरे,जाहीरात, फलेक्स वर खर्च न करण्याचे आवाहन केले होते.  यावेळी देखील राज्याचे कृषी व फलोत्पादन मंत्री असताना राज्यातील शेतक-यावर दुष्काळी परिस्थितीचे व नापिकीचे सावट असल्याचे पाहून वाढ दिवस साजरा न करण्याचे आवाहन केले. त्यांच्या या आवाहनला उस्फुर्त प्रतिसाद देत खामगांव तसेच राज्यातील कार्यकर्ते, पदाधिकारी, विविध सामाजिक संघटना, संस्था, कर्मचारी, व जनसामान्यांनी आपआपल्या परिने विविध रकमेचे चेक ना.भाऊसाहेब फुंडकर यांच्या स्वाधीन केले.

मुंबई येथे एका बैठकीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फुंडकर यांनी 13 लाख 17 हजार एवढया रकमेचे धनादेश सुपुर्द केले.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: buldhana marathi news fundkar birthday expense to cm funds