
देशात चौथ्या, तर महाराष्ट्रात प्रथम क्रमांक चंद्रपूर शहराने प्राप्त केला. सध्याची कोरोना प्रभावित परिस्थिती लक्षात घेता केंद्र सरकारच्या नागरी कार्य व गृहनिर्माण मंत्रालयातर्फे स्वच्छ महोत्सव पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन ऑनलाइन करण्यात आले होते.
चंद्रपूर : स्वच्छ भारत मिशन" अंतर्गत "स्वच्छ सर्वेक्षण २०२०' मध्ये चंद्रपूर महानगरपालिकेस देशातील स्वच्छ शहरांमध्ये "चौथ्या " क्रमांकाचा पुरस्कार आज ऑनलाइन स्वच्छ महोत्सव केंद्रीय नागरी विकासमंत्री हरदीपसिंह पुरी यांनी जाहीर केला.
देशात चौथ्या, तर महाराष्ट्रात प्रथम क्रमांक चंद्रपूर शहराने प्राप्त केला. सध्याची कोरोना प्रभावित परिस्थिती लक्षात घेता केंद्र सरकारच्या नागरी कार्य व गृहनिर्माण मंत्रालयातर्फे स्वच्छ महोत्सव पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन ऑनलाइन करण्यात आले होते.
हेही वाचा - नागपूर ग्रामीण ब्रेकिंगः अखेर विहिरीत पडलेला एक मूषक ठरला ‘त्या’ तिघांचा काळ ...
चंद्रपूर महानगरपालिकेने आपल्या शहराचा स्वच्छता आलेख नेहमीच उंचावत नेला आहे. हीच परंपरा कायम राखत गतवर्षी स्वच्छ सर्वेक्षण २०१९' मध्ये देशातील २९ व्या क्रमांकाचे मानांकन प्राप्त केले होते. यावर्षी देशातील चौथ्या क्रमांकाचे स्वच्छ शहर म्हणून झेप घेतली आहे.
हा पुरस्कार चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी एकात्म भावनेने केलेल्या स्वच्छताविषयक जाणिवांचा व प्रत्यक्ष स्वच्छता कार्याचा असल्याची प्रतिक्रिया महापौर राखी कंचर्लावार व आयुक्त राजेश मोहिते यांनी व्यक्त केली. या स्वच्छता महोत्सवात स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये सहभागी संपूर्ण देशभरातील ४ हजाराहून अधिक शहरांमधून चंद्रपूर शहराने देशातील चौथ्या क्रमांकाचे स्वच्छ शहर तर महाराष्ट्र राज्यातील प्रथम क्रमांकाचे स्वच्छ शहर म्हणून गौरविण्यात आले आहे.
स्वच्छ सर्वेक्षणाच्या अनुषंगाने केंद्रीय स्वच्छता निरीक्षक समितीद्वारे महानगरपालिका क्षेत्रातील स्थळांची पूर्वकल्पना न देता प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणी करीत असताना नागरिकांशी सहजपणे संवाद साधत त्यांच्याकडून शहरातील स्वच्छतेविषयी प्रत्यक्ष अभिप्राय घेण्यात आले होते. त्याचप्रमाणे केंद्र सरकारने स्वच्छ भारत अभियानांतर्गत सुरू केलेल्या स्वच्छता ॲपवरही नागरिकांच्या प्रतिसादाची नोंद घेण्यात आली होती. तसेच स्वच्छ भारत मिशनच्या राष्ट्रीय केंद्रातून अनेक नागरिकास दूरध्वनी करून शहरातील स्वच्छतेविषयी त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यात आल्या होत्या.
असे का घडले? - पती, मुलांना श्रद्धांजली वाहून ‘तिने’ संपवले जीवन, वाचा नेमके काय झाले
नागरिकांचे आभार व अभिनंदन
स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शहराला स्वच्छतेत उत्कृष्ट क्रमांकावर आणले. त्याबद्दल नागरिकांचे आभार व अभिनंदन करते. मागील आयुक्त संजय काकडे व वर्तमान आयुक्त राजेश मोहिते यांच्या नेतृत्वात महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी यांनी परिश्रम घेतलेय स्वछता जनजागृती करण्यात सर्व नगरसेवकांनी जी मोलाची मदत केली त्याचे हे फलित आहे.
राखी कंचर्लावार,
महापौर मनपा चंद्रपूर.
संपादन - अथर्व महांकाळ