esakal | अरे वा! चक्क महिलांनी टाकले मटणाचे दुकान; आत्मनिर्भराची ‘उमेद’
sakal

बोलून बातमी शोधा

Chandrapur women open meat shop

महिला सक्षमीकरणासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. याच उदात्त हेतूने महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनन्नोत्ती अभियानाचे (उमेद) कार्य सुरू आहे. गोंडपिपरी तालुक्यात देखील या अभियानाअंतर्गत जोरात काम सुरू आहे. अशातच सहा महिण्यांपूर्वी या अभियानाअंतर्गत महिलांच्या शेळी उत्पादक गटांची निर्मिती झाली.

अरे वा! चक्क महिलांनी टाकले मटणाचे दुकान; आत्मनिर्भराची ‘उमेद’

sakal_logo
By
संदीप रायपूरे

गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : गावात महिलांनी एकत्र येत बकरा कापायला सुरवात केली अन् एकत्र गर्दी झाली. नेमक यांचे चाललच काय हा प्रश्न गावकऱ्यांना पडला आणि महिलांनी बकऱ्याच्या मटणाच दुकान उघडल्याची माहिती मिळाली. मग काय मटणप्रेमींनी दुकानात एकच गर्दी केली. अगदी काही वेळातच महिलांच्या दुकानातून पूर्ण बकऱ्याच मटण हातोहात खपल.

महिला आज कोणत्याही क्षेत्रात मागे नाही. शिक्षण, नौकरी, उद्योगधंदे आदी क्षेत्रात महिला बरोबरीत आहेत. यातच पुरुषांच्या खांद्याला खांदा लाऊन ती संसाराचा गाडा देखील तेवढ्याच ताकतीने खेचत असल्याचे चित्र आहे.

अवश्य वाचा - अविश्वसनीय! विदर्भातील या गावात चक्क डायनासोर द्यायचे अंडी: काही वर्षांपूर्वी सापडले होते अवशेष

अशातच आता महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवन्नोनत्ती अभियानाअंतर्गत (उमेद) गोंडपिपरी तालुक्यातील विठ्ठलवाडा गावात मटणाच्या दुकानाचे उद्घाटन करण्यात आले. महिला उत्पादक गटातर्फे या दुकानातून आता मटणाचा व्यवसाय सुरू झाला आहे. उमेद अभियानाअंतर्गत जिह्यातील हा पहिला प्रयोग आहे.

महिला सक्षमीकरणासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. याच उदात्त हेतूने महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनन्नोत्ती अभियानाचे (उमेद) कार्य सुरू आहे. गोंडपिपरी तालुक्यात देखील या अभियानाअंतर्गत जोरात काम सुरू आहे. अशातच सहा महिण्यांपूर्वी या अभियानाअंतर्गत महिलांच्या शेळी उत्पादक गटांची निर्मिती झाली.

हेही वाचा -  पितृपक्ष : ना गाय, ना श्वान श्राद्ध केले की कावळ्यालाच देतात नैवेद्य.. पण का? जाणून घ्या शास्त्रीय कारण

शुक्रवारी विठ्ठलवाडा येखील नवनिर्माण शेळी उत्पादक गटाने मटण शाॅपचा शुभारंभ केला. विठ्ठलवाड्यातील विश्वशांती ग्रामसंघाने जिल्ह्यात पहिलाच हा प्रयोग सुरू केला आहे. यावेळी अभियानाच्या तालुका व्यवस्थापक ममता गोरघाटे, नरेंद्र मेश्राम, प्रतीक्षा खोब्रागडे, मिनाक्षी उराडे, किशोर हिंगाणे, प्रकाश रामटेके, मंजू कांबळे, नवराज चंद्रागडे यांच्यासह विठ्ठलवाड्यातील उत्पादक गटाच्या महिला शालू बावणे, रजणी ताजणे, वैशाली लोहकरे, अर्चना चंद्रगिरीवार, दिपा ताजणे, माधुरी रामटेके, कौशल्या पवार आदींची उपस्थिती होती.

अधिक माहितीसाठी - .. तर विदर्भात महापूर आलाच नसता.. महापुराला जबाबदार कोण? ऐतिहासिक विसर्ग करण्याची खरंच गरज होती का?

व्यवसाय अर्थाजनासाठी सज्ज

तालुक्यात विविध घटकांवर कार्यरत असलेल्या २१ गटांना कर्जस्वरुपात अर्थपुरवठा करण्यात आला. यात राष्ट्रीय ग्रामीण आर्थिक परिवर्तन प्रकल्पाअंतर्गत असलेल्या शेळी उत्पादक गटांनी शेळी पालनाचा धंदा सुरू केला. व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जातून प्रारंभी शेळी, बोकडांची खरेदी केली. सहा महिण्यांपूर्वी सुरू केलेला हा व्यवसाय आता अर्थाजनासाठी सज्ज झाला आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

loading image