चिमुकल्याने हाती घेतली पोलिस बंदोबस्ताची सूत्रे आणि... 

child worked like a police in Yatavmal read inspirational story.
child worked like a police in Yatavmal read inspirational story.

यवतमाळ : विनाकारण फिरणाऱ्यांना घरचा रस्ता दाखविण्यासाठी पोलिस कर्तव्यावर असताना त्यांच्यासमोर खाकी वर्दी परिधान केलेला चिमुकला आला. ठाणेदार धनंजय सायरे यांना कडक सॅल्यूट ठोकून काही वेळासाठी बंदोबस्ताची सूत्रे आपल्या हाती घेतली. विनाकारण फिरणाऱ्या व्यक्तींना घरीच थांबण्याचा सल्ला देत दंडुकाही दाखविला. काही वेळासाठी का असेना, त्या चिमुकल्याने स्वत: पोलिस झाल्याचा आनंद घेतला. विशेष म्हणजे हा चिमुकला इतर सर्वसामान्य मुलांप्रमाणे नव्हताच, मग... 

कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने लॉकडाउनचा निर्णय घेण्यात आला. या कालावधीत नागरिकांनी घरीच सुरक्षित रहावे, असे आवाहन करण्यात आले होते. तरीदेखील काही बहाद्दर विनाकारण रस्त्यावर येतातच. यवतमाळ शहरासह नेर, पांढरकवडा, दारव्हा, पुसद येथे 31 जुलैपर्यंत लॉकडाउन घोषित आहे. मात्र, "यवतमाळकर हैं की, मानते नही', असा अनुभव वारंवार येत आहे. गतिमंद असलेल्या चिमुकल्याने खाकी वर्दीत रस्त्यावर उतरून वाहनचालकांना दंडुका दाखवला. त्यामुळे गतिमंद तो चिमुकला नसून, विनाकारण फिरणारेच आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी कळंब चौकात ऐकायला मिळाली. 

पोलिसांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 

नागरिक लॉकडाउनच्या नियमांचे पालन न करता घराच्या बाहेर पडत असल्याने पोलिसांवर कामाचा ताण वाढत आहे. पेट्रोलिंगदरम्यान यवतमाळ शहरातील कळंब चौकातील दृश्‍य आश्‍चर्यचकित करणारेच होते. पोलिसांच्या मदतीला एक छोटासा गतिमंद कोरोना वॉरियर समोर आला. ठाणेदारांना कडक सॅल्यूट ठोकत बंदोबस्ताची सूत्रे आपल्या हाती घेतली. यावेळी पोलिसांकडून त्याला तितकाच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 

चिमुकल्यांना जे कळले ते नागरिकांना का कळू नये? 

लॉकडाउनदरम्यान ये-जा करणाऱ्यांचे ओळखपत्र तपासून दंडुके लावत बाहेर न निघण्याची तंबी दिली. हे दृश्‍य बघून कोरोना काळात सतत कामाच्या तणावाखाली असलेल्या पोलिसांच्या चेहऱ्यावर काही काळासाठी समाधानाची लकेर उमटली. गतिमंद असल्याने त्या चिमुकल्याला आतापर्यंत उपेक्षा सहन करावी लागली. मात्र, संवेदनशील ठाणेदार धनंजय सायरे यांच्यामुळे त्याच्यात आत्मविश्‍वास निर्माण झाला. जे चिमुकल्याला कळाले, ते सामान्यांना का कळू नये, हादेखील एक प्रश्‍न आहे. 

वसीमचा सल्ला प्रत्येकाने पाळावा 
मी दर महिन्याला पांढरकवडा मार्गावरील आस्मा बहुउद्देशीय संस्थेच्या गतिमंद मुलांच्या शाळेत जाऊन त्यांना खाऊ वाटप करतो. त्यामुळे वसीमसोबत जुनी ओळख असून, तो मला मामा म्हणतो. बंदोबस्तादरम्यान मामा, मामा करीत तो खाकी वर्दीत पुढे आला. लोकांचे ओळखपत्र बघून घरीच थांबण्याचा सल्ला दिला. गतिमंद असलेल्या वसीमने घरी थांबवण्याचा दिलेला सल्ला प्रत्येकाने पाळला पाहिजे. 
धनंजय सायरे,
ठाणेदार, शहर पोलिस ठाणे, यवतमाळ. 

संपादन -  अतुल मांगे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com