Coronavirus test negative.jpg
Coronavirus test negative.jpg

...तर या जिल्ह्याने कोरोनाला हरविल्याचा इतिहास लिहिला जाईल

वाशीम : जिल्ह्यातील एका व्यक्तीच्या घशातील लाळेचा नमुना ‘पॉझिटिव्ह’ आला होता. त्यामुळे जिल्हा प्रशासनासह नागरिकांनी कोरोनाचा चांगलीच धास्ती घेतली होती. मात्र, त्यानंतर सदरील इसमाच्या संपर्कातील बारा नमुने ‘निगेटिव्ह’ आले. तसेच उर्वरित दोन नमुने देखील (ता.7) ‘निगेटिव्ह’ आले आहेत. त्यामुळे प्रशासनासह नागरिकांनी देखील सुटकेचा श्‍वास घेतला आहे. परिस्थिती पोलिस प्रशासन व जिल्हा प्रशासन यांच्या प्रयत्नाने आटोक्यात असलीतरी नागरिकांनी आता या शेवटच्या टप्प्यात धीर धरण्याची गरज आहे. प्रशासनाने आणखी प्रभावी उपाययोजनांची अंमलबजावणी केली तर, पुढील पंधरवाड्यात वाशीम जिल्ह्याने कोरोनाला हरविल्याचा इतिहास लिहिला जाईल.

जिल्ह्यामध्ये एकजण कोरोनाबाधित असला तरीही, जिल्हा प्रशासनाच्या अथक प्रयत्नांने कोरोनाचा प्रसार होण्यास प्रतिबंध बसत आहे. यासाठी पोलिस प्रशासन रस्त्यावर खडा पहारा देत आहे. त्यामुळेच उर्वरित दोन नमुने ‘निगेटिव्ह’ आले आहेत. ही जिल्हावासींसाठी आनंदाची बाब असली तरीही, जिल्ह्यातील नागरिकांची जबाबदारी आणखी वाढली आहे. पोलिस प्रशासन गर्दी टाळण्याचा अटोकाट प्रयत्न करीत आहे. त्यांच्यामुळेच जिल्हा कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर आहे. मात्र, या परिस्थितीत प्रशासनानेही कडक पावले उचलण्याची गरज आहे.

पावले उचला, सवयी बदलतील
जिल्हा प्रशासनाने गेल्या पंधरा दिवसांत पुरेशा उपाययोजना केल्यानेच, जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती आवाक्याबाहेर गेली नाही. पोलिस प्रशासनाची समर्थ साथ मिळाल्याने जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी नागरिकांच्या साथीने कोरोनाला हरविण्यासाठी आरपार लढाईचे बिगूल फुंकले आहे. आता या शेवटच्या टप्प्यात जिल्हाधिकारी यांनी भाजीपाला, किराणा, फळे यांची प्रतिष्ठाणे किमान आठ दिवसतरी पूर्णपणे बंद करण्याची गरज आहे.पेट्रोल मूबलकपणे मिळत असल्याने रस्त्यावर विनाकारण फिरणार्‍या टारगटांनाही उत येत आहे. 

पोलिस प्रशासन याला आवरण्यासाठी प्रयत्न करीत असले तरीही, शेवटी टारगटांची संख्या व पोलिस बळ याचा विचार करता जिल्हाधिकारी यांनी किमान चार दिवसाच्या टप्प्यात पेट्रोलपंपही बंद करण्याची गरज आहे. एरव्ही दर आठ दिवसाला भाजीपाला व महिन्याला किराणा भरणारे नागरिक एका वस्तूसाठी घराबाहेर पडतात. कोरोनाला हरविण्यासाठी नागरिकांनी स्वतःच्या अस्तित्वासाठी आता सवयी बदलणे गरजेचे आहे. जीवनावश्यक वस्तूंचा नियम असला तरी, जीवन असले तरच नियम असतील. ही बाब लक्षात घेऊन जिल्हाधिकार्‍यांनी कठोर निर्णय घेण्याची गरज आहे.

अशा असाव्यात उपाययोजना
कोरोना विषाणूला जिल्ह्यात अटकाव करण्यासाठी आता शेवटच्या टप्प्यात प्रशासनाला कडक पावले उचलणे गरजेचे आहे. भाजीपाला व किराणा आठ दिवस बंद करणे गरजेचे आहे. पेट्रोल पंपावर होणारी गर्दी पाहता आठ दिवस पेट्रोल पंपही बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागणार आहे. वैद्यकीय कारणासाठी कुणाला वाहनाची गरज असेल तर, त्यासाठी जिल्हा अधिकारी कार्यालय व तालुक्याच्या ठिकाणी तहसीलमध्ये टोल फ्री क्रमांक असावा, यावर फोन केल्यास आरोग्य विभागाच्या फिरत असलेल्या रुग्ण वाहिका उपलब्ध करून देण्यात याव्यात, भूकबळी होऊ नये यासाठीही अपरिहार्य परिस्थितीत पुरवठा विभागाकडे टोल फ्री क्रमांकावर मागणी नोंदविण्याची सोय असावी, खातरजमा झाल्यावर राशन घरपोच देण्यासाठी स्वयंमसेवी नागरिकांची मदत घ्यावी, किमान काही दिवस आपण ही कसरत केली तर, जिल्ह्याचे आरोग्य खणखणीत राहण्यास मदत होणार आहे.

जिल्ह्यातील कोरोनाचा तपशील
गृह अलगीकरण ......... 18
संस्थात्मक विलगीकरण ..01
अलगीकरण कक्ष ........ 01
घशातील स्त्रावाचे नमुने... 17
पॉझिटिव्ह अहवाल ...... 01
निगेटिव्ह अहवाल ........16
.....................(आज-02)
अहवाल अप्राप्त नमुने .... 00

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com