esakal | अखेर गडचिरोलीत पोहोचली कोरोना लस, शनिवारपासून लसीकरणाला सुरुवात
sakal

बोलून बातमी शोधा

corona vaccine reached in gadchiroli

शनिवारी जिल्ह्यातील पाच लसीकरण केंद्रांवर प्रत्येकी 100 कर्मचारी याप्रमाणे एकूण 500 लोकांना लस टोचणार आहेत. या लसीकरणाच्या प्रारंभदिनानिमित्त व त्याच्या नियोजनाबाबत व्हीसीद्वारे विभागीय आयुक्त संजीव कुमार यांनी नागपूर विभागातील सर्व जिल्ह्याचा आढावा घेतला.

अखेर गडचिरोलीत पोहोचली कोरोना लस, शनिवारपासून लसीकरणाला सुरुवात

sakal_logo
By
मिलिंद उमरे

गडचिरोली : जगभरात मोठी महामारी होऊन थैमान घालणाऱ्या कोरोनाचा प्रतिबंध करणारी लस अखेर जिल्ह्यात दाखल झाली असून शनिवार (ता. 16) पहिल्या टप्प्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लस दिली जाणार आहे. 

हेही वाचा - बहिण भावाला बोलवायला गेली, खिडकीतून दृश्य बघताच मोठ्यानं किंचाळली

शनिवारी जिल्ह्यातील पाच लसीकरण केंद्रांवर प्रत्येकी 100 कर्मचारी याप्रमाणे एकूण 500 लोकांना लस टोचणार आहेत. या लसीकरणाच्या प्रारंभदिनानिमित्त व त्याच्या नियोजनाबाबत व्हीसीद्वारे विभागीय आयुक्त संजीव कुमार यांनी नागपूर विभागातील सर्व जिल्ह्याचा आढावा घेतला. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी अनंत वालस्कर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रुडे, डॉ. बागराज दुर्वे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुनील मडावी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी फरेंद्र कुतीरकर उपस्थित होते. गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालय, अहेरी, आरमोरी, कुरखेडा उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय, चामोर्शी अशा पाच ठिकाणी 100 प्रमाणे 500 कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. यानंतर 9966 पैकी उर्वरित आरोग्य कर्मचाऱ्यांना पुढील काळात लस दिली जाणार आहे. या नियोजनाबाबत आढावा घेताना विभागीय आयुक्त संजीव कुमार यांनी उपस्थितांना सूचना केल्या. ते म्हणाले की, जिल्हा मुख्यालयी नियंत्रण कक्ष स्थापन करावा. लसीकरणाबाबत पुरवठा, साठवणूक व प्रत्यक्ष लसीकरण याबाबत त्या कक्षातून संनियंत्रण करावे.

हेही वाचा - घरात लक्ष्मी आली म्हणून बाप वाटत होता पेढे, पण एक फोन आला अन् सर्वच संपलं

लसीकरणा पश्‍चात येणाऱ्या अडचणी व चुकीचे गैरसमज दूर करण्यासाठी हा कक्ष काम करेल, त्याचबरोबर लसीकरण प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी, व्यत्यय व लोकांकडून येणाऱ्या समस्या अतितत्काळ सोडविण्यासाठी सर्व सहा जिल्ह्यांतील या प्रक्रियेतील अधिकारी, डॉक्‍टर्स व तज्ज्ञ यांचा व्हॉट्‌सऍप ग्रुप केला जाणार आहे. जेणेकरून लसीकरण प्रक्रिया सोईस्कर होईल, असे ते म्हणाले. ऑनलाइन संकेतस्थळावर लस द्यायच्या कर्मचाऱ्यांची माहिती अपलोड केली जाणार आहे. त्यातील नावांप्रमाणे 100 लोकांची एका केंद्रावर निवड केली जाणार आहे. शनिवारी एकूण 9966 पैकी 500 कर्मचाऱ्यांची निवड लसीकरणासाठी होणार आहे. त्यातील निवडलेल्या व्यक्तींना मोबाईलवर संदेश पाठविला जाणार आहे. तसेच जिल्हा कक्षाकडून दूरध्वनीद्वारे लसीकरण ठिकाण व वेळ कळवली जाणार आहे. ही प्रक्रिया ऑनलाइन नावे नोंदविल्याप्रमाणे कर्मचाऱ्यांना सूचना मिळतील त्यांनीच लसीकरण केंद्रावर उपस्थित राहावे. जर संदेश मिळाल्यानंतर एखाद्याला येणे शक्‍य नसेल तर त्याबाबतची माहिती आपल्या कार्यालयाकडे द्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित न येणाऱ्या कर्मचाऱ्याऐवजी पुढील कर्मचाऱ्यांची निवड करता येईल. यामध्ये प्रारंभदिनापूर्वी इतर आजार असलेल्या कर्मचाऱ्यांना कोविड लस दिली जाणार नाही. पुढील लसीकरणाच्या टप्प्यात त्यांना लस उपलब्ध केली जाणार आहे. 

हेही वाचा - यालाच म्हणतात नशीब! खात्यातून चोरीला गेले लाखो रुपये, पण तीन महिन्यानंतर मिळाले परत

मिनी मॉक ड्रिल -
लसीकरण योग्यरीत्या व्हावे, याकरिता गुरुवार (ता. 14) मिनी मॉक ड्रीलही घेण्यात आली. शनिवारी होणाऱ्या 5 केंद्रांवरील लसीकरणाआधी मिनी मॉक ड्रील प्रत्येकी 10 लाभार्थी याप्रमाणे दुपारी 1 तास घेण्यात आली. लसीकरण तयारी व प्रक्रिया याबाबत प्रात्यक्षिक घेतले गेले. विशेष म्हणजे जिल्हा समान्य रुग्णालयात यापूर्वीच मॉक ड्रिल झाल्यामुळे पाचपैकी इतर चार ठिकाणी ही ड्रिल झाली. यात उपजिल्हा रुग्णालय अहेरी, आरमोरी, कुरखेडा व चामोर्शी या ठिकाणांचा समावेश आहे.
 

loading image