Yavatmal Teachers Tax Notice : शिक्षकांवर उडाले ‘टॅक्स’ चोरीचे शिंतोडे दारव्हा पंचायत समितीतील प्रकार; आयकर विभागाच्या नोटीस

Hundreds of Teachers Face ITR-Related Penalties : अमरावती शहर, बडनेरा तसेच मेळघाटातील धारणी आणि चिखलदरा तालुक्यांमध्ये आगामी काळात पाणीटंचाई तीव्र होण्याची शक्यता आहे.
Yavatmal Teachers Tax Notice

Yavatmal Teachers Tax Notice

esakal

Updated on: 

यवतमाळ : दारव्हा पंचायत समितीतील शेकडो शिक्षकांवर ‘टॅक्स’ चोरीचे शिंतोडे उडाले आहे. आयकर विभागाने संबंधित शिक्षकांना बजावलेल्या नोटीसनंतर ही बाब उजेडात आली आहे. आता ‘त्या’ शिक्षकांना साधारणतः पाच ते १५ हजार रुपयांचा दंड भरण्याची वेळ आली आहे.

दरवर्षी ३१ ऑगस्टपर्यंत शिक्षकांना ‘इन्कम टॅक्स रिटर्न’ भरणे अनिवार्य आहे. त्या अनुषंगाने शिक्षक फॉर्म क्रमांक १६ आणि रिटर्न एखाद्या ‘चार्टड अकाउंटंट’च्या माध्यमातून भरून घेतात. तर काही पंचायत समितीतील लिपिकाच्या माध्यमातून बहुतांश शिक्षक रिटर्न भरताना दिसून येतात.

मात्र, गेल्या चार ते पाच वर्षांपासून दारव्हा पंचायत समितीतील शिक्षकांना रिटर्न भरताना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. या प्रकारामुळे शिक्षकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. अशाच पद्धतीने रिटर्न भरण्याचे काम यंदाही दारव्हा पंचायत समितीत कार्यरत एका शिक्षकाच्या माध्यमातून ‘चार्टड अकाउंटंट’ करीत होते. यासाठी देण्यात येणाऱ्या ‘फी’ मधून संबंधित शिक्षकसुद्धा स्वतःचा हिस्सा काढून घेत होता.

Yavatmal Teachers Tax Notice
Election Commission: 'एसआयआर'ला सुप्रीम कोर्टाचे कायदेशीर कवच; अंतर्गत टिपण्या म्हणजे संस्थात्मक मतभेद नव्हेत! मुख्यमंत्र्यांचा पलटवार

त्या शिक्षकावर विश्‍वास ठेवून पंचायत समितीतील शेकडो शिक्षकांनी यंदाचे रिटर्न भरण्याचे काम संबंधित शिक्षकालाच सोपविले होते. संपूर्ण शिक्षकांचे रिटर्न ३१ ऑगस्ट २०२६ पूर्वी भरून घेणे आवश्यक होते. मात्र, त्या शिक्षकाने चालढकल केली. वेळोवेळी शिक्षकांना रिटर्न भरणार असल्याचा बनाव केला. निर्धारित तारीख गेल्यानंतरही शिक्षकांचे ‘रिटर्न’चे फॉर्म भरण्यात आलेच नाही.

परिणामी, शिक्षकांवर ‘टॅक्स’ चोरीचा ठपका ठेवण्यात आला असून, आयकर विभागाने आता दारव्हा पंचायत समितीतील शेकडो शिक्षकांना नोटीस बजावल्या आहेत. यात ‘टॅक्स’ न भरल्याने पाच ते १५ हजार रुपयांपर्यंतचा दंड ठोठावण्यात आल्याचे नमूद आहे. या प्रकारामुळे शिक्षकांमध्ये एकच खळबळ उडाली असून, काम करून देण्याच्या नावाने फसवणूक करणाऱ्या ‘त्या’ शिक्षकावर आता रोष व्यक्त केल्या जात आहे.

शिक्षक घेणार आक्रमक भूमिका

गेल्या काही वर्षांपासून ‘रिटर्न’ भरण्यात सावळा गोंधळ सुरू आहे. या प्रकाराला कंटाळून काही शिक्षकांनी विरोध केला होता. मात्र, माझ्याकडूनच हे काम करून घ्यावे लागेल, असा दबाव ‘त्या’ शिक्षकाने टाकल्याची चर्चा आता दबक्या आवाजात सुरू आहे. आता आर्थिक भुर्दंड बसल्यामुळे शिक्षक आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहे.

Yavatmal Teachers Tax Notice
H-1B Visa US Rules : डोनाल्ड ट्रम्प भारतीयांना आणखी एक मोठा झटका देण्याच्या तयारीत; H-1B व्हिसा पूर्णपणे बंद होणार?

काही ठिकाणी लिपिकाचा समावेश

दरवर्षी शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना ‘रिटर्न’ भरणे अनिवार्य आहे. ‘चार्टड अकाउंटंट’ हे काम करीत असतो. परंतु प्रत्येकांपर्यंत पोहचण्यात अडचणी निर्माण होतात. त्यामुळे पंचायत समितीतील लिपिक, शिक्षकांना थोडाफार हिस्सा देवून हाताशी धरण्यात येत आहे. यात काही पंचायत समितीतील चक्क लिपिकच हे काम करीत असल्याची चर्चाही कर्मचाऱ्यांमध्ये सुरू आहे. अशा लिपिकांवर कारवाई करणे गरजेचे झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com