
गेल्या दहा ते बारा दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर लाखोच्या संख्येने हरियाणा पंजाब येथील शेतकरी मोदी सरकारने आणलेल्या नव्या कृषी कायद्याविरोधात आंदोलन करीत आहेत. या आंदोलनाची आग आता संपूर्ण भारतभर पेटत असून आज शहर व ग्रामीण भागात बंद पुकारून राष्ट्रीय महामार्गावर निषेध आंदोलन करण्यात आले.
तिवसा (जि. अमरावती ) : आज संपूर्ण भारतभर शेतकऱ्यांच्या समर्थनात पक्ष व विविध संघटनेच्या वतीने बंदचे आव्हान करण्यात आले होते. या बंदला प्रतिसाद अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात गुरुकुंज मोझरी येथील शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्गावर काही वेळ चक्का जाम आंदोलन केले, तर तिवसा शहरात देखील विविध पक्ष्याच्या वतीने आंदोलना करण्यात आले. यावेळी शेकडो शेतकरी उपस्थित होते.
हेही वाचा - Bharat Band Updates : अमरावतीत संमिश्र प्रतिसाद, काही ठिकाणी आंदोलकांची धरपकड
गेल्या दहा ते बारा दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर लाखोच्या संख्येने हरियाणा पंजाब येथील शेतकरी मोदी सरकारने आणलेल्या नव्या कृषी कायद्याविरोधात आंदोलन करीत आहेत. या आंदोलनाची आग आता संपूर्ण भारतभर पेटत असून आज शहर व ग्रामीण भागात बंद पुकारून राष्ट्रीय महामार्गावर निषेध आंदोलन करण्यात आले, तर गुरुकुंज मोझरी येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर युवा संघर्ष संघटना व शेतकऱ्यांनी काहीवेळ महामार्ग रोखून मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केले. यावेळी युवा संघर्ष संघटनेचे कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा - पोलिसांनी धमकावल्यानेच माजी नगरसेवकाचा मृत्यू, नातेवाईंकाचा आरोप; शहराला पोलिस छावणीचे स्वरूप
तिवसा शहर कडकडीत बंद -
तिवसा शहरात सर्व व्यवसायिकांना काल पूर्व सूचना देऊन शेतकऱ्यांच्या आंदोलनास पाठींबा देऊन आपली प्रतिष्ठाना बंद ठेवण्याचे आव्हान केले होते. या आव्हानाला शहरातील व्यवसायिकांनी चांगला प्रतिसाद दिला तर राष्ट्रीय महामार्ग भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी, भारतीय मार्क्सवादी पक्ष, प्रहार, छत्रपती संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना मोठ्या प्रमाणात तिवसा बंद मध्ये सहभागी झाल्या होत्या. यावेळी राष्ट्रीय महामार्गावर विविध पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्तित होते.