१५ जूनपासून वनमहोत्सव; साथीच्या प्रादुर्भावाचा वृक्षलागवडीला फटका

१५ जूनपासून वनमहोत्सव; साथीच्या प्रादुर्भावाचा वृक्षलागवडीला फटका

अमरावती : पावसाळा सुरू झाला की मोठ्या प्रमाणावर शासकीय आणि अशासकीय यंत्रणा, विद्यार्थी, विविध संघटनांकडून वृक्षलागवड (Tree planting) केली जाते. परंतु, दोन वर्षांपासून वृक्षलागवड मोहिमेला कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावाचा फटका (Covid caused the result) बसला आहे. त्यामुळे आवश्यक तेवढी वृक्षलागवड जिल्ह्यात होऊ शकली नाही. (Forest-Festival-from-June-15)

राज्यात १५ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत वनमहोत्सवाचे आयोजन केले जाते. महत्त्वाची बाब म्हणजे २०१७ पासून ५० कोटी वृक्षलागवड हा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. या कार्यक्रमांतर्गत २०१९-२०२० या वर्षासाठी ३३ कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. परंतु, कोविड-१९ च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कोणत्याही विभागाला वृक्षलागवडीचे लक्ष्यांक दिले गेले नाही.

१५ जूनपासून वनमहोत्सव; साथीच्या प्रादुर्भावाचा वृक्षलागवडीला फटका
ऑनलाइन शिक्षणासंदर्भात चिमुकलीने मुख्याध्यापकांना लिहिले पत्र; सर...

स्वत:हून वृक्षलागवडीसाठी पुढाकार घेणाऱ्यांची संख्या बोटावर मोजण्याइतकी आहे. तरीही बरेच जण हा उपक्रम अखंडपणे राबविताना दिसतात. राजकीय संस्था, संघटनांकडून असे उपक्रम दोन वर्षांमध्ये तेवढ्या उत्साहाने राबविलेच गेले नाही. सामाजिक वनीकरण विभागाने गत वर्षभरात त्यांच्या उपक्रमांतर्गत तीन लाख वृक्षलागवड केली.

वनविभाग (प्रादेशिक) यांच्याकडूनही ठराविक ठिकाणी विविध प्रजातींची झाडे लावले गेली. या पावसाळ्यात सामाजिक वनीकरण विभागाने अमरावती जिल्ह्याचा विचार करता ४ लाख ९३ हजार खड्डे वृक्षलागवडीसाठी खोदून ठेवले आहेत. लागवड करणे, विक्री करण्यासाठी जवळपास अठरा महिने वयाचे सात लाख रोपे तयार आहे. याव्यतिरिक्त नऊ महिने वयाचे १२ लाख रोपे तयार होत आहेत.

१५ जूनपासून वनमहोत्सव; साथीच्या प्रादुर्भावाचा वृक्षलागवडीला फटका
नागपूरकरांनो, संपूर्ण अनलॉक नाहीच! वाचा काय असणार सेवांची नवीन वेळ

असे आहेत दर

९ महिन्यांचे रोप : १० रुपये

१८ महिन्यांचे रोप : ४० रुपये

१८ महिन्यांचे रोप : ५० रुपये

(दर केवळ वनमहोत्सव कालावधीसाठी)

यावर्षी शासनाकडून वृक्षलागवडीसाठी लक्ष्यांक दिलेले नाही. तरीही दरवर्षीचा उपक्रम म्हणून सामाजिक वनीकरणाची वाटचाल सुरू आहे.
- नितीन गोंडाने, उपवनसंरक्षक, सामाजिक वनीकरण, अमरावती

(Forest-Festival-from-June-15)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com