पंतप्रधान पीक विमा योजना : चार लाख शेतकऱ्यांना ठेंगा

पंतप्रधान पीक विमा योजना : चार लाख शेतकऱ्यांना ठेंगा

यवतमाळ : गेल्या खरीप हंगामात पिकांचे संरक्षण करण्यासाठी जिल्ह्यातील चार लाख ६७ हजार २१ शेतकऱ्यांनी (Farmer) पीकविमा उतरविला होता. यातील केवळ ६१ हजार शेतकऱ्यांना पंतप्रधान पीकविमा योजनेतून (Prime Minister Crop Insurance Scheme) मदत मिळाली आहे. उर्वरित तब्बल चार लाख शेतकऱ्यांना मदतीसाठी अपात्र ठरविण्यात आले. (Four lakh farmers were declared ineligible by the insurance company)

जिल्ह्यात गेल्यावर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. जिल्ह्यातील चार लाख ६७ हजार शेतकऱ्यांनी तीन लाख ३६ हजार ६५९ हेक्‍टरचा पीकविमा उतरविला. यासाठी विमा कंपनीकडे ३५ कोटींचा भरणा केला. गेल्या खरीप हंगामात अतिवृष्टी आणि ओल्या दुष्काळामुळे पिकांना फटका बसला.

पंतप्रधान पीक विमा योजना : चार लाख शेतकऱ्यांना ठेंगा
वडिलांच्या भेटीसाठी मुलाने दुचाकीने केला ६७० किलोमीटरचा प्रवास

सोयाबीन, कापूस या प्रमुख पिकांचे अतोनात नुकसान झाले. तूर शेतकऱ्यांच्या घरात येईल अशी अपेक्षा असताना पुन्हा पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला. त्यामुळे पंतप्रधान पीकविमा योजनेचे कवच असल्याने शेतकऱ्यांना विमा मिळण्याची अपेक्षा होती. त्यातून काही प्रमाणात का होईना, यावर्षीच्या हंगामासाठी शेतकऱ्यांना थोडा आधार मिळाला असता. मात्र, याठिकाणीही शेतकऱ्यांची निराशा झाली. पीकविमा उतरविलेल्या शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक जोखीम परतावा मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. त्यासाठी राजकीय पक्षांनी आंदोलनेही केलीत. मात्र, शेतकऱ्यांच्या तोंडाला विमा कंपन्यांनी पान पुसण्याचे काम केले.

चार लाख ५० हजार शेतकऱ्यांपैकी ६१ हजार शेतकऱ्यांनाच पीक विम्याचा लाभ मंजूर झाला आहे. विमा कंपन्यांनी ४७ कोटींचा लाभ जिल्ह्याला दिला असला तरी अनेक शेतकरी मदतीपासून वंचित आहेत. सर्वाधिक फटका सोयाबीन पिकाला बसला असतानाही केवळ २५ हजार शेतकरी मदतीस पात्र ठरले. कापूस पीकही पावसाने शेतकऱ्यांच्या हातून गेले. जवळपास दीड लाख शेतकऱ्यांनी विमा उतरविला. यातील केवळ १० हजार कापूस उत्पादकांना १२ कोटींचा पीक विमा मंजूर करण्यात आला. मूग, उदीड, तूर या पिकांनाही कमी अधिक प्रमाणात फटका बसला. विमा कंपन्यांकडून या पिकांनाही नाममात्र मदत देण्यात आली. त्यामुळे विमा कंपन्याविरोधात शेतकऱ्यांच्या मनात नाराजी आहे.

पंतप्रधान पीक विमा योजना : चार लाख शेतकऱ्यांना ठेंगा
चंद्रशेखर बावनकुळे अचानक मौनात! राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा

सोयाबीन, कापूस उत्पादकांना फटका

ओल्या आणि कोरड्या दुष्काळाने शेतकऱ्यांचे हुकमी पीक म्हणून ओळख असलेल्या कापूस, सोयाबीन पिकांना फटका बसला. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले असून विमा कंपनीकडून लाभ मिळेल, या आशेवर शेतकरी होते. मात्र, प्रमुख पीक हातातून गेल्याने शेतकऱ्यांचा गेल्यावर्षीचा हंगाम कोरडाच गेला. आता तरी पीक विम्याचा लाभ मिळावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

(Four lakh farmers were declared ineligible by the insurance company)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com